दिल तेरे बिन कही लगता नही
वक्त गुजरता नही
क्या यही प्यार है ??
How can one truly define what love is?
:हां ,यही प्यार है “ हे कुणी सांगू शकेल का ?
अगदी शंभर वेळा प्रेमात पडून बाहेर येणारा माणूस सुद्धा हे सांगू शकणार नाही. It’s concepts are just a never ending story of an open book of experiences.
दोन माणसे एकमेकांकडे ओढली जाण्याची अनेक कारणे असतात. मैत्री, आकर्षण, बुद्धिमता पण तो काळ लांबवायला एकाच गोष्टीची गरज असते. एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम. नाते निर्माण करणे सोपे, ते टिकवण्यासाठी मात्र प्रेमाच्या डिंकाची गरज भासते.
वयात येताना वाटणारे प्रेम हे तर जैविक असते. निसर्गाचा हात असतोच.
त्यामुळे कधीना कधी तरी माणूस प्रेमात पडतोच. तरीही प्रत्येकाचा प्रेमाकडे बघण्याचा नजरिया वेगळा असल्याने प्रेमाची व्याख्या करणे महा कठीण काम आहे.
एक मात्र निश्चित , प्रेमात पडण्याचा क्षण हा अत्यानंदाचा क्षण असतो. The person in love feels an intense feeling of euphoria and deep affection for someone.
“बडे धोखे है इस राह में”
असेलही पण Love is much more than a risk,.
जोखीम, धोका, भीती वाटूनही , आयुष्यात एकदा तरी माणूस प्रेमात पडतोच. शेवट माहित नसलेल्या काळ्या कभिन्न भुयारात स्वतःला ढकलून देतो.
पाडगावकरांची प्रसिद्ध कविता आहे.
प्रेम म्हणजे प्रेम असते
तुमचे आमचे सेम नसते.
प्रेम असेल हो पण ते सेम नसते.
ते खेळकर असते, अल्लड असते, क्रूर असते, विखारी असते, मत्सरी असते, दुर्बल असते, हट्टी असते, धाडशी असते, विद्रोही असते … जशी ती व्यक्ती असते , तसे तिने केलेले प्रेम सुद्धा तिचा रंग ल्याते .
व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे . खरेतर १४ फेब्रुवारीच कशाला? हा पूर्ण महिनाच प्रेमाच्या उत्सवाचा. त्यात हा मौसम सुद्धा अनुकूल. प्रेम विषयाची ओळख करून दिली हिंदी सिनेमाने आणि प्रेम व्यक्त करायचा धीर दिला तो ती हिंदी सिनेगीतांनी . त्या गीतांवरील ही पोस्ट .
१)अस्पष्ट , धूसर प्रेम
—————————–
नक्की कोणत्या वयात प्रेमाची जाणीव होते सांगता येत नाही. आता तर दहा -अकरा वर्षाची मुले सुद्धा सैराट होतात.
पूर्वी वयात येण्याच्या अगोदरच मुलींची लग्ने होत असत. वयात आले की त्या सासरी जात. जोडीदाराचा सहवास म्हणजेच प्रेम असे समजून संसार सुरु होई. नंतर ही प्रथा बंद झाली पण वयात येणे हा निसर्गाचा नियम आहे. तो केवळ शरीराला लागू नाही तर मनाला सुद्धा आहे . कितीही पुस्तकांचे, अभ्यासाचे ओझे असेल, नियमांचा धाक असेल तरी कळीचे फुल होण्याची प्रक्रिया काही थांबू शकत शकत नाही.
कथा ,कादंबऱ्या वाचून , सिनेमा पाहून मनात प्रेमाचे धुमारे फुटायला सुरुवात होतेच आणि कल्पनेतल्या राजकुमाराचा शोध सुरु होतो . ही भावना अलगद उमललेली, अस्पष्ट. केवळ कल्पना.
कोणीतरी हवासा वाटतो . तो जो कोणी असतो त्याच्याशिवाय आयुष्य अधुरे वाटते हे खरे.
खरेतर माहीत सुद्धा नसतो तो कसा आहे , कधी भेटेल , भेटलाच तर कुठे , का नाहीच भेटणार .पण त्या काळात आपल्या आशा , स्वप्ने आणि अपेक्षा प्रेमाच्या अस्तित्वाला जिवंत ठेवतात हे निश्चित.
बहारो मेरा जीवन भी सवारो
(सिनेमा -आखरी खत, संगीतकार-खय्याम, गीतकार- कैफी आझमी, गायिका -लता मंगेशकर)
तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलीचे हे स्वप्न. बहरून आलेला निसर्ग तिच्या चित्तवृत्तीला मोहरून टाकत आहे. वसंत तिच्याही मनात फुलला आहे. त्यालाच साद घालताना ती म्हणते,
बहारो मेरा जीवन भी सवारो
कोई आये कहींसे, यू पुकारो बहारो
या सृष्टीला तुझ्या स्पर्शाने फुलवले आहेस तू . मलाही फुलवणाऱ्या त्याला सुद्धा तूच घेऊन ये .
या मुलीची अपेक्षा आहे ती आयुष्यभर साथ देणाऱ्या जीवनसाथीची .
साठीच्या दशकातला हा सिनेमा . मुलींच लग्न झाले म्हणजे आयुष्याचे सार्थक झाले असे मानायचा हा काळ आणि यातल्या लज्जोला तिचे म्हणावे असे कोणीच नाही . एक सावत्र आई , जिला ही मुलगीच नकोशी झाली आहे.
हाताला मेहंदी लागावी आणि आपण कोणालातरी हवेसे वाटावे याहून दुसरी काय अपेक्षा असणार या पहाडी मुलीची!
लगाओ मेरे इन हाथोंमे मेहंदी
सजाओ मांग मेरी , या सिधारो
आई वडील, नातलग , मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर आयुष्य मजेत जात असताना , कधीतरी मनाला कुणाचीतरी, कशाची तरी तहान लागते. असे वाटते, या जगात, कुठेतरी कुणीतरी फक्त आपल्यासाठी बनलेले आहे. To love , and be loved.
ज्याच्या अस्तित्वाने, आपल्या आयुष्याला अर्थ येईल, ज्याच्यामुळे आयुष्य जगण्याला एक दिशा मिळेल , आपल्या सुखात, दुःखात , आयुष्याच्या चढ़ उतारात, ज्याचा हात आपल्या हातात असेल.
अर्थात अनेक वेळा ही व्यक्ती कोण हे ही स्पष्ट नसतेच. ही फक्त आकाराला येणारी भावना असते. त्याला चेहेरा नसतो. असाच कुणीतरी येईल का ह्याचीही खात्री नसते. तरीही आयुष्याचा जुगार खेळताना आपल्या आशा, अपेक्षा , स्वप्ने मात्र जिवंत असतात.
२ )मुग्ध प्रेम
——————-
प्रेमात पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ते व्यक्त होणे नैसर्गिक नाही. ते सांगावे लागते आणि ते सांगण्यासाठी धीर करावा लागतो . सर्वानाच ते जमत नाही. कधीतरी परिस्थिती अनुकूल नसते . कधी त्याच्या मनाचा अंदाज नसतो आणि कधी स्वतःच्या मनाचा सुद्धा ठाव लागत नाही . समाजाची , आपल्याच माणसांची भिती मनावर बंधने घालते हे खरे पण प्रेम खरे असेल तर अंधारात सुद्धा वाट उजळून येते . दोन मने जुळली असतील तर शब्दांचा सुद्धा आधार घ्यावा लागत नाही .
कोणीतरी हवेहवेसे येण्याची चाहूल लागली आहे पण त्याच्या येण्याने जे वादळ उठेल ते मी कसे थोपवणार . त्या पेक्षा मनातल्या गोष्टी मनातच ठेवणे श्रेयस्कर . रात्रीची वेळ मात्र मनातील विचारांना अडवायला असमर्थ असते. सारे जग झोपलेले असताना मनाचा चाळा कुणाला कळणार! बघणारे कुणीच नसेल तर विचारांची मर्यादा सहज ओलांडली जाते.
प्रेम झोपेचे खोबरे करते ते असे.
जाने क्या बात है , नींद नही आती, बडी लंबी रात है
सिनेमा -सनी , संगीतकार आर डी बर्मन, गीतकार- आनंद बक्षी , गायिका -लता मंगेशकर)
जब-जब देखूँ मैं ये चाँद-सितारे
ऐसा लगता है मुझे लाज के मारे
जैसे कोई डोली, जैसे बारात है
जाने क्या बात है…
जेन ऑस्टिन चे एक प्रसिद्ध वाक्य आहे.
“A lady’s imagination is very rapid; it jumps from admiration to love, from love to matrimony in a moment.”
अजून तर त्याच्याशी भेट झालीही नाही पण हिच्या कानावर शहनाईचे सूर पडायला सुरुवात सुद्धा झाली .
प्रेमाचा समारोप कसाही होऊ दे, जो पर्यंत माणूस प्रेमात असतो, त्याचे दिवस भारलेले असतात हे नक्कीच.
३)पहिले प्रेम — उस्फुर्त प्रेम
———————————
दिल तो पागल है मध्ये शाहरुखचा प्रसिद्ध डायलॉग आहे ” प्यार भी एक ही बार होता है ”
तसे खऱ्या आयुष्यात होत नाही . सफल झालेले पहिले प्रेम ही लॉटरी आहे . ती सर्वानाच लागत नाही . पहिले प्रेम मात्र सफल होवो व न होवो , हृदयाच्या कोपऱ्यात मात्र प्रतिमा राहतेच . पहिल्या प्रेमाच्या वेळी माणसाची पाटी कोरी असते. अपेक्षाभंगाचा डाग नसतो. त्या बद्दल ऐकलेले असते, वाचलेले असते, दुसऱ्या कोणाच्या तरी नजरेतून प्रेक्षक होऊन पाहिलेले सुद्धा असते पण जेव्हा स्वतःची पाळी येते तो अनुभव मात्र कल्पनेलाही अकल्पित असतो.
“I love you” हे तीनच शब्द केवढे प्रत्ययकारी आहेत याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा त्या शब्दांना एक चेहेरा येतो . त्याच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण ओठावर हसू आणतो. त्याचा आवाज, तो नसेल तरी मनाच्या कानाकोपऱ्यातुन साद घालतो. हातात गुंफलेल्या हातांचा स्पर्श, हात निसटून गेला तरी काटा आणतो. हे खूळ आहे हे समजत असते पण तरीही तो चाळा हवाहवासा वाटतो. तो नसताना त्याची प्रत्येक गोष्ट, त्याचा गंध, त्याची ती ओठांची कड मुडपून हसणे, त्याचा आवाज ..त्याची प्रत्येक साधीशी गोष्ट तुम्हाला आठवते.
विश्वास ठेवा, ते नुसते आकर्षण नसते .
पहिल्या प्रेमाची हाक असते ती.
पहला नशा , पहला खुमार
( सिनेमा – जो जिता वोही सिकंदर, संगीतकार- जतीन ललित, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, गायक -उदित नारायण , अलका याज्ञीक)
पहला नशा –नशा म्हणजे कैफ , उन्माद ..(intoxication) गाण्याचा पहिलाच शब्द म्हणजे पहिल्या प्रेमाची हर्षभरित अवस्था.
प्रेमात पडल्यावर जे मदभरी क्षण असतात, ती ओढ, ती आसक्ती, ती भुरळ, पहिल्या प्रेमाच्या अनुभूतीचा थरार, तारुण्याचा जोश आणि आत्मविश्वासातली निरागसता हे सर्व “पहला नशा पहला खुमार” या दोन ओळीत मजरुह सुलतानपुरी यांनी व्यक्त केले आहे. The song conveys the mixed emotions of exhilaration, apprehension and euphoria.
उसने बात की, कुछ ऐसे ढंग से
सपने दे गया वो हज़ारों रंग के
उसने बात की, कुछ ऐसे ढंग से
सपने दे गया वो हज़ारों रंग के
रह जाऊँ जैसे मैं हार के
और चूमे वो मुझे प्यार से
प्रेम हळूहळू अंगात भिनत जाते आणि माणसाचा जोगिया होतो. एकमेकांत हरवलेली दोन तरुण हृदये आपल्याच जगात रमलेली आहेत , जिथे काळ सुद्धा थांबला आहे. पूर्ण गाण्याचे चित्रण स्लो मोशन मध्ये आहे. वाऱ्यावर तरंगत चालल्यासारखे आयुष्य, जिथे विचाराला स्थान नाही.
प्रेमात माणूस आंधळा होत नाही ..फक्त एकीकडेच डोळे स्थिरावल्याने त्याला बाकीचे रंग दिसत नाहीत..
हे गीत म्हणजे आठवणींचा कल्लोळ.
कॉलेजमध्ये गेल्याचा फील येतो.
४)हट्टी प्रेम
——————
प्रेमाची किंमत बरीच मोजावी लागते . स्वतःचा अहंकार बाजूला ठेवणे, दुसऱ्याला मनात पहिल्या स्थानावर बसवणे ही गोष्ट वाटते तेवढी साधी नाही . “मै तुम में समा जाऊं ” हे मनाच्या बाबतीत फार कठीण आहे . त्यामुळे प्रेमाचा इजहार करणे प्रत्येकाला जमत नाही .
The intense love always hurts. It is excruciating. One’s emotions change from one second to the next.पहिल्यांदा तुम्ही स्वतःशी मान्य करता की तुम्हाला दुसऱ्याची गरज आहे .
One feels vulnerable.
दुसऱ्याचे आपल्यावर प्रेम नाही हे समजून सुद्धा माणसे का राहतात !
सेल्फ रिस्पेक्ट असो वा नसो , पण जर तुमचे खरंच प्रेम असेल तर त्याच्या सुखात तुम्ही सुख मानावे की. दोघांचे एकच सुख असे स्वतःच ठरवणे नी हटवादी पण जपणे म्हणजे खरेतर तुमचे तुमच्यावर प्रेम असते नी तुम्हाला हवे तोपर्यंत त्यांनीही तेच करावे अशी तुमची इच्छा असते.
पुरुषाच्या बाबतीत तर नकार स्विकारणे फार कठीण असते .. स्वार्थापोटी असेल किंवा अहंकारापोटी . पुरुषी वर्चस्वाच्या समाजाच्या कल्पना सुद्धा पुरुषाला नकार स्विकारायला देत नाहीत.
जादू तेरी नज़र, खुशबू तेरा बदन
( सिनेमा -डर, संगीतकार- शिव हरि, गीतकार- आनंद बक्षी, गायक- उदित नारायण)
स्त्री बद्दल असलेल्या आकर्षणाचे हव्यासात रूपांतर व्हायला अनेक कारणे असतात. तिचे सौंदर्य, तिचे गुण, तिच्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन , जो त्यांच्याशी मिळता जुळता असू शकतो. अनेक वेळा हवे ते, हवे तेव्हा मिळत गेल्याने आलेला माज असतो.
त्याहून महत्वाचे कारण असते , की they see them as a source of validation.
ज्या माणसांना स्वतःबद्दल न्यूनगंड असतो, ज्यांच्या आयुष्यात त्यांना मान देणारे कुणी नसते , किंवा जे दुर्लक्षित असतात, त्यांना एखाद्या व्यक्तीमार्फत स्वतःची किंमत तपासायची असते. नैराश्येत डुबलेली माणसे , एकटी पडलेली माणसे अशा मार्गाचा अवलंब करून स्वतःची प्रतिमा स्वतःच्याच डोळ्यात उंचावण्याचा प्रयत्न करतात. नकार मिळाला तर बहुधा स्त्री स्वतःला संपवते. पुरुष अनेक वेळा नकार देणाऱ्या व्यक्तीला संपवतो.
प्रवृत्तीचा फरक आहे.
जादू तेरी नज़र, खुशबू तेरा बदन
तू हाँ कर या ना कर, तू है मेरी किरन
तू है मेरी किरन
तू माझे केवळ स्वप्न नाही तर माझे भाग्य आहेस. त्याला मी कुणाचेही होऊ देणार नाही. यात तुझ्या मर्जीचा प्रश्नच नाही. तुझा होकार असो किंवा नकार.
तू फक्त माझी आहेस .
५) सावध प्रेम
——————
प्रेम कोणत्याही वयात होते. जेव्हा तुमच्या भावना आणि नैसर्गिक प्रेरणा, तर्काला मात देतात तेव्हा माणूस प्रेमात पडतो.
लहान वयात तर जगाचा अनुभवच नसतो. माणसांची ओळख पटण्याएवढे शहाणपण नसते, एकतर आपल्यासारखे जग आहे किंवा आपण अत्यंत हुशार आहोत असा भाबडेपणा अंगात असतो किंवा वयाचा उतावीळपणा या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करायला लावतो. अशावेळी चुकीचा निर्णय घेतला गेला की आपण प्रेम आंधळे असते असा प्रेमालाच दोष देतो.
प्रेमात पडण्याची क्रिया एकाच वेळी आकर्षक, विस्मयजनक, गोंधळून टाकणारी असते आणि जर माध्यम चुकले तर ती सर्वनाश करू शकते.
बाबूजी धीरे चलना, प्यार में, ज़रा सम्भलना
(सिनेमा -आर पार, संगीतकार – ओपी नय्यर, गीतकार- मजरूह सुल्तानपुरी, गायिका-गीता दत्त)
गीता दत्त चे ट्रेंडमार्क सॉंग. गीताचे गाणे ऐकल्यावर एक गोष्ट नेहेमी लक्षात येते. ती फक्त गळ्याने गात नाही. तिचे गाणे हृदयातून येते. शब्दातील भावना स्वरांना चिकटून येतात. She just cruises through the tune. .
हे एक क्लब सॉंग आहे. गिऱ्हाईकाला रिझवतानाच प्रेमातल्या धोक्यांची कल्पना देणे ह्याला आत्मविश्वास म्हणायचा का प्रामाणिकपणा , का शुद्ध व्यावहारिकता?
“ बघ बाबा, पडणारच असशील तर स्वतःच्या जबाबदारीवर. यातल्या धोक्यांची पूर्वसूचना निदान माझ्याकडून आलेली आहे”
एखादा दुकानदार कपडे विकताना , रंगाची खात्री नाही , गेले तर परत घेतले जाणार नाही ह्या अटीने विकतो तसे वाटते हे गाणे मला.
ये मुहब्बत है ओ भोलेभाले
कर न दिल को ग़मों के हवाले
काम उलफ़त का नाज़ुक बहुत है
आ के होंठों पे टूटेंगे प्याले
हाँ बड़े धोखे हैं…
काही म्हणा, तिचा हेतू कोणताही असो, समजावण्याची तिची धडपड उल्लेखनीय. प्रेमात अपयश आले की माणूस दुःखाने पिचून जातो, जगणे विसरून जातो. तोंडाशी आलेला सुखाचा पेला फुटून गेला की आयुष्यातून उठतो.
ते होऊ नये म्हणून तिने इलाज सुद्धा सांगितला आहे.
हो गयी है किसी से जो अनबन
थाम ले दूसरा कोई दामन
ज़िंदगानी की राहें अजब हैं
हो अकेला है तो लाखों हैं दुश्मन
हाँ बड़े धोखे हैं…
या गाण्याशी संबंधित गीता काय किंवा ओपी या दोघांना वेळेत हा इलाज करणे मात्र जमले नाही.
६) साशंक प्रेम
———————
मला तू आवडतोस/ तेस . सहज म्हणतो आपण पण आवडणे हा फसवा शब्द आहे . त्याच्यात कमीटमेंट नसते. काही व्यक्ती पाहिल्याबरोबरच आवडतात . कुठे तरी जुळते , पटते . “अरे , ओळखत सुद्धा नाही, हा काय खुळेपणा ? असे म्हणून मनाला वेसण घालायचा प्रयत्न करतो खरे, पण तो खुळेपणा ही आवडायला लागतो .
No wonder,this feeling makes us giddy, irrational and even ridiculous. आपल्याला लक्षात येते , हे काही साधे आवडणे नाही … आवडण्याच्या पुढचे पाऊल आहे आणि मग मात्र धडधड सुरु होते …
हे मान्य करणे म्हणजे कमीटमेंट आली. तिला तर आहेच पण याचे काय ! ही नायिका हुशार आहे . आपला प्रियकर बेरहम , बेवफा आणि बेदर्दी असण्याची शक्यता जाणून आहे . सुरुवातीलाच दिलेली ही प्रेमळ धमकीवजा विनंती .
चले जाना नही नैना मिलाके , सैया बेदर्दी
( सिनेमा -बडी बहेन, संगीतकार-हुस्नलाल -भगतराम, गीतकार-राजिंदर कृष्ण, गायिका-लता मंगेशकर)
नुसती धमकी देऊन ती थांबत नाही. ह्याचाही पुढे जाऊन ती त्याला इशारा देते,
मेरी कसम तुम्हे मेरे ही होके रहना ,
दिलोंकी बात किसी औरो से न कहना
तू फक्त माझाच असणार आहेस हे सांगतेच कारण त्याच्या उडत्या नजरेला ती चांगली जाणून आहे पण केवळ तेवढेच नाही तर स्वतःची बदनामी होऊन न देण्याबाबत ती सावध सुद्धा आहे.
त्याला मात्र आपल्याला समजले आहे हे समजू नये याची खबरदारी घेताना ती त्याला प्रेमाने चुचकारते,
नन्हीं सी जान मेरी कहो न जलाओगे
छोड़ के मुझे कहीं चले तो न जाओगे
भूल जाना नहीं दिल में बसा के
हाय! सैंय्या बेदर्दी, सैंय्या बेदर्दी
खुंटा हलवून कसा घ्यावा हे शिकवणारे गाणे आहे हे.
७)कृतज्ञ प्रेम
——————–
साल १९५५ , राणीखेत येथे रंगीन राते या सिनेमाचे शूटिंग चालू होते . शम्मी समोर होती गीता बाली. त्यावेळची प्रसिद्ध नटी. शम्मीचा मात्र तो उमेदवारीचा काळ होता. निसर्गरम्य वातावरण आणि सिनेमात असलेली सुंदर गाणी; याच्या पार्श्वभूमीवर ती आली, तिने पाहीले, ती जिंकली आणि हा पठ्ठ्या सफ़शेल उताणा पडला.
तिथल्या तिथे त्याने मागणी घातली. तीन चार महिने नेट लावून धरला आणि गीता प्रसन्न झाली. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पहाटे चार वाजता बाणगंगेला लग्न केले दोघांनी आणि मग घरच्यांचा आशीर्वाद घेतला .
कुठेही लपवाछपवी नाही. मागणी सुद्धा सरळसोट . मी आहे हा असा आहे …
“Will you marry me ?”
खात्री आहे तिने होकार दिल्यावर त्याने” याहू” अशी डरकाळी फोडून पुजार्याला उठवून लग्न केले असणार .
In his cinemas, Shammi not only praised his heroines, he cherished them, pampered them, revered them, loved them, wooed them ,worshiped them and finally won them. शम्मीची प्रेमकहाणी त्याच्या सिनेमा एवढीच साधी. . चित्रपटसृष्टीत नायकाला जिथे नायीकेकडून “अब हमें आपके कदमोंमे युं रहना होगा” हे गाणे ऐकायची सवय आहे त्या जमान्यात शम्मी “एहसान तेरा होगा मुझपर ,दिल चाहता है वो कहने दो ” सहज सांगून गेला. कृतज्ञ प्रेमाचे पुरुषाचे दुसरे गीत माझ्या नजरेत नाही …
एहसान तेरा होगा मुझपर
(सिनेमा -जंगली, संगीतकार-शंकर जयकिशन, गीतकार-हसरत जयपुरी, गायक- मोहम्मद रफी)
प्रेमात कृतज्ञतेला जागा असावी का?
मला तरी ती उपकाराची जाणीव असह्य होते. प्रेम समान पायावर असावे मग त्या दोघांची समाजात जागा कुठेही असो. एकाची गरज जेवढी तीव्रतेने आहे तेवढीच जर दुसऱ्याची नसेल तर एकासाठी ते कृतज्ञतेचे आणि दुसऱ्यासाठी उपकाराचे ओझे होते. मात्र दोघांच्यात अहंकाराला जागा नसावी.
चाहे बनालो चाहे मिटादो
मर भी गये तो देंगे दुवायें
उड उड के कहेंगी खाक सनम
ये दर्द मोहब्बत सहने दो,
एहसान तेरा होगा मुझपर
A song full of tenderness.
एक मात्र आहे, स्वतः बद्दल कितीही आत्मविश्वास असेल तरीही कोणीतरी आपल्यावर प्रेम करतय ही भावना सुखावणारी .. त्या नात्यात एक दिलासा असतो, एक जिव्हाळा असतो, एक समाधान असते.
Love is comforting.
८) आश्वासक प्रेम
—————————
बहारो के सपने हा सिनेमा मिल मजदुरांच्या संघर्षावर आधारित होता. टिपिकल नासिर हुसैन सिनेमा नव्हता तो.
राजेशही अगदी वेगळ्या अवतारात होता. त्याच्या जोडीला होती आशा पारेख. हा सिनेमा खूप चालला नाही पण आर डी ने आपली चुणूक दाखवली.
आजा पिया तोहे प्यार दूँ,
(सिनेमा – बहारोंके सपने, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार-, मजरूह सुलतानपुरी, गायिका -लता मंगेशकर)
बायका अनेकदा कोड्यात बोलतात. करणे आहेत त्याची. कधी कधी लाज आडवी येते, कधी धैर्य नसते, कधी मर्यादा थांबवते .
फार कमी गाणी आपल्या भावना डायरेक्ट व्यक्त करतात . हे त्यातले एक .
आजा पिया तोहे प्यार दूँ, गोरी बैयाँ तोपे वार दूँ
किसलिए तू इतना उदास,
सुखें सुखें होंठ, अँखियों में प्यास किसलिए, किसलिए ?
हिंदी सिनेमाला विरहगीत नवीन नाही. विरहाचे दुःख अनेक गीतात आहे पण ते एकएकट्याने सहन केले आहे. हे नाते मात्र खूप खोल, अंतरंगाचा वेध घेणारे, आश्वासक आणि प्रामाणिक .
इथे त्याचे दुःख ती वाटून घेत आहे. इथे ती अभिसारिका नाही, आकर्षित करण्यासाठी हे गाणे वापरले नाही . अपयशाने तो पराभूत झाला आहे. त्याच्या मनाला उभारी देणारे हे गीत आहे.
रहने दे रे, जो वो जुल्मी है
पथ तेरे गाओं के
पलकों से चुन डालूंगी मैं
काँटे तेरी राहों के
हो, सुख मेरा लेले, मैं दुख तेरे लेलूँ
तु भी जिये, मैं भी जियूँ
हो, आ जा पिया…
स्त्री कोणत्याही रुपात असो, ती अनंत काळाची माता होऊ शकते हे खरे.
९)कामुक प्रेम
——————–
बॉलीवूड जरी प्रेम आणि शृंगाराच्या पायावर उभे असले तरी स्त्रियांच्या नजरेतून, शारीरिक प्रेमाच्या अनुषंगाने लिहिलेली गाणी अतिशय कमी आहेत. प्रेम खट्याळ, पवित्र, निरपेक्ष सगळे काही असते पण जेव्हा त्याची कामुक बाजू दाखवायचा प्रश्न येतो, तेव्हा सेन्सॉर बोर्ड जागा होतो. खजुराहोची जी मंदिरे या देहाच्या सोहळ्याला समर्पित आहेत, तिथे शारीरिक प्रेमाचा अर्थ फार वेगळा आहे. समागम ही नुसती क्रिया नाही तर ते आहे पुरुष आणि स्त्री दोहोंसाठी, स्वतःचे काहीही मागे न ठेवता सर्वस्व अर्पून टाकणे. प्रेमाची संपूर्णता स्वतःच्या विलयातून अनुभवणे. त्याची सुरुवात होते ती मनाच्या ओढीतून. मग ती एवढी वाढत जाते की देहाचे स्वतंत्र अस्तित्व सुद्धा सहन होत नाही . “मी” पण विरघळण्याचा हा क्षण तितकाच पवित्र असतो कारण त्यातून नवनिर्मितीचे, पर्यायाने सृष्टीचे सातत्य सांभाळले जाते .
चार पुरूषार्थात कामाचे एवढे महत्व असताना सुद्धा त्याविषयी लिहिण्याची, बोलण्याची मोकळीक का नसावी ?
स्त्रीच्या धीट मागणीचे एक गीत डी-डे या सिनेमात आहे.
एक घडी और ठहर के जां बाकी हैं
( सिनेमा-डी -डे , संगीतकार शंकर एहसान लॉय, गीतकार -निरंजन अय्यर, गायिका -रेखा भारद्वाज)
एक घडी और ठहर के जां बाकी हैं
तेरे लब पे मेरे होने का निशां बाकी हैं
रात्रीचा प्रहार एकमेकांच्या सहवासात जागवण्यात संपला आहे. एकमेकांना बिलगून, एक हात दुसऱ्याभोवती लपेटून , नुसत्या स्पर्शाने बोलण्यात. रात्र तर संपून गेली , पण बोलणे मात्र सरलच नाही . सरल्या रात्रीचा अनुभव मात्र
अजून गात्रागात्रांत असताना , तुझ्या ओठावरील माझ्या खुणा अजूनही स्पष्ट असताना तू कसा जाऊ शकतोस असे केलेले कोवळे आर्जव आहे हे .
सहवासातील जवळीक आणि तरीही मनात नव्याने जागणारी अतृप्तताच ही.
यूं बिछड के मुझसे ना सजा दे खूद को
अभी हाथोंसे तेरे जुर्मं ओ गुनाह बाकी है
एक घडी और ठहर के जां बाकी हैं.
प्रणयाच्या प्रत्येक अनुभवाच्या वेळी उमटलेल्या तुझ्या हाताच्या दणकट स्पर्शाच्या खुणा अजूनही माझ्या अंगावर ताज्या आहेत. त्याची जाणीव तुझ्याही मनात झिरपत असतानाच माझ्यापासून विलग होण्याची सजा तू स्वतःला कशी देऊ शकतोस?
जे घडून गेलेले आहे ते सुख, त्याच्या कोवळेपणाला धक्का न लावणारी तरीही धीट अशी ही मागणी .
खिलते फुलोंका फसाना तो बस बहाना था
बुझते शोलोंका दास्तां बाकी है
कळीचे फुल तर तू केले आहेस पण त्या फुललेल्या मनातली पेटलेल्या आगीचे काय ! ते धगधगते निखारे सुद्धा तू शांत करून जा …
भर ओसरलेला आहे. रात्रीचा, तिचा सुद्धा. तरीही उजाडणाऱ्या ,रंगीत आभाळावर एखादी चांदणी लुकलुकावी तशी रात्रीची आठवण तिच्या मनात जागी आहे.
अजूनही त्याच्या मिठीतले गुंतलेपण अजून जागे आहे .
शब के चेहेरे पे चढा रंग सवेरे का तो क्या
ढलते ख्वाबॊ में अभी अपना जहाँ बाकी है
एक घडी और ठहर के जां बाकी हैं.
Love is “——”
एकमेकांच्या संगतीत ओठांवर फुललेले हास्य म्हणजे प्रेम ..
आयुष्याच्या या पडावावर आल्यावर , मला पटलेली ही ओळख आहे.
Fyodor Dostoyevsky चा हा quote मला अतिशय आवडतो. मनापासून पटतो सुद्धा.
“If you wish to glimpse inside a human soul and get to know a man, don’t bother analyzing his ways of being silent, of talking, of weeping, of seeing how much he is moved by noble ideas; you will get better results if you just watch him laugh. If he laughs well, he’s a good man.”
किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया
(सिनेमा -पतिता, संगीतकार-शंकर जयकिशन, गीतकार-शैलेंद्र , गायिका-लता मंगेशकर )
कुणाचेच आयुष्य परिपूर्ण नसते. प्रत्येक पायरी चढताना, पराभव, वेदना, अगतिकता, विश्वासघात, मृत्यू यांचा सामना होतो. माणूस ठोकर खातो, परत उभे राहतो, कधीतरी या प्रवासात स्वतःवरचा विश्वास सुद्धा गमावून बसतो . नशीबवान असाल तर या लांबलचक प्रवासात एक कोणीतरी तुमच्या थकलेल्या चेहेऱ्यावर हास्याची रेखा उमटवतो .
किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया
अँधेरे घर में किसीने हँसके चराग़ जैसे जला दिया.
आयुष्य छोटे, गुंतागुंतीचे असते. जोडीदाराच्या तुमच्या कल्पना कोणत्याही असोत, त्यात एक मात्र add करायला विसरू नका.
Settle for someone who brightens your days with a smile , cracks jokes at the worst times , turns your fear into confidence and even plants a kiss on your cheek when you least expect it.
कवी शैलेंद्र सुद्धा हेच सांगून गेले आहेत.
न प्यार देखा, न प्यार जाना
सुनी थीं लेकिन कहानियाँ
जो ख़्वाब रातों में भी न आया, वो मुझको दिन में दिखा दिया
किसीने अपना बनाके मुझको मुस्कुराना सिखा दिया……
प्रेम दिनाच्या शुभेच्छा!

“आप की नज़रों ने समझा”, “हम प्यार मे जलनेवालों को”, “ऐ मुहब्बत ज़िंदाबाद”….अजून पुष्कळ आठवतील.👍👌
Aap ki –Gratitude
Ham pyar me – restless
Ai mohabbat – Bold
Yes ..so many facets
खुपच detailed love… सुंदर गाणे आणि त्यांचा आशय… loved it…. ❤️
Thank you so much Radha.
सुरेख लेख व सुरेख गाणी 👌👌
Mangala , Thank you .
प्रिया,
खूप सुंदर..
❤️❤️❤️
अर्थात नेहेमी प्रमाणे च..
तू प्रत्येक वेळी एक वेगळा नजरिया ठेवून लिहितेस..
Thank you Vidula.:)
एका भावनिक जवळकीतून सुरू झालेला प्रवास वचनबद्धते कडे झुकतो आणि त्याची परिपूर्तता करता करता अविरत सुरु राहतो ते प्रेम, इतकं कसे सुरेख लिहिलेत!
गाणी जितकी क्लास तितकेच रसग्रहण खास ❤❤
Kamini, Thanks a lot
” प्यार के लाखो रंग ” . प्रेम ही भावना एकच पण प्रत्येकाची तर्हा वेगळी. खूप सुरेख गाणी घेतलीस आणि नेहमीसारखच अप्रतिम लिहीलयेस
Nayana, Thank you.