Skip to content

निरोपाची गाणी .

अनेकवेळा आवडत्या माणसांचा निरोप घेणे हे अत्यावश्यक असते. It is necessary to make one understand there
are consequences for the choice that one makes.  

आजची पोस्ट आहे निरोपाच्या गाण्यांची. 

१) तडजोड, संवाद आणि रात्रीचा सहवास , लग्न टिकवण्याची ही त्रिसूत्री मानली जाते. मधुचंद्राच्या धुंदीतून बाहेर आल्यावर समजते, लग्न हा पूर्णवेळ करावा लागणारा व्यवसाय आहे. तो चालत राहावा असे वाटत असेल तर या बेडीत अडकलेल्या दोन्ही माणसांची ती जबाबदारी आहे. Made for each other is a myth. दोन वेगळी माणसे एकमेकांना जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करतात, तेव्हा एकमेकांच्या सहवासात, एकमेकांसाठी बदलतात. विकसित होतात. लग्न यशस्वी होते. 
जेव्हा दुसऱ्या माणसानेच आपला विचार करावा अशा अपेक्षा ठेवल्या जातात, तेव्हा एका बाजूने नाराजीचे मूळ रुजते. जेवढे दाबले जाईल तेवढे वाढते आणि एके दिवशी लग्न कोसळते.
भ्रमाचा भोपळा फुटणे हे भयप्रद आणि दुःखदायक असले तरी त्याचा  शेवट हा न संपणाऱ्या एखाद्या भयपटापेक्षा सुसह्य असतोच. 
घटस्फोट एका क्षणात होत नाही. हळू हळू शरीरातील पेशी न पेशी ना कळून चुकते की हे टिकणारे नाही. ह्याला आयुष्य नाही. जेव्हा हे समजुतीने घेतले जाते, तेव्हा दुःखातही एक सुटकेचा निश्वास असतो.
एकमेकांना रक्तबंबाळ करून त्या जखमांची बिरुदे अंगावर मिरवण्यापेक्षा, घडलेल्या घटनांचे दायित्व स्वि कारून, स्वतःला आणि दुसऱ्यालाही क्षमा करून, रस्ता बदलणे पुढचा प्रवास सोपा करते.

बॉब मार्लीचे “ one cup of coffee”  हा असा समजुतीने घेतलेला निरोप आहे.

“one cup of coffee”
By Bob Marley
——————————-
नायकाची स्वतःची चूक त्याला मान्य आहे. जे घडले त्या बाबत पश्चाताप आहे आणि शक्यतो तिचे आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करून , तिच्या आयुष्यातून जाण्याचा त्याचा निर्धार आहे. घेतलेला निरोप अटळ आहे पण हा अध्याय बंद करताना , त्यातली अपमानाची, दुःखाची , संतापाची तीव्रता कमी व्हावी ही त्याची मनापासून इच्छा आहे. 

One cup of coffee, then I’ll go;
One cup of coffee, then I’ll go
Though I just dropped by to let you know
That I’m leaving you tomorrow;
I’ll cause you no more sorrow:
त्यांचा घटस्फोट झालेला आहे. वकिलांनी सांगितलेले पैसे त्याने तिच्या अकाउंट मध्ये जमा केले आहेत.
मुलांचा ताबा त्याच्या पत्नीला दिला आहे. ते ही त्याला मान्य आहे. पण त्यांच्या आयुष्यातून जाण्यापूर्वी, त्याला त्यांच्या मुलांना शेवटचे डोळे भरून पाहायचे आहे.

Tell the kids I came last night
And kissed them while they slept;
Make my coffee sweet and warm
Just the way you used to lie in my arms
I brought the money like the lawyer said to do
But it won’t replace the heartache I caused you;
It won’t take the place of lovin’ you, I know
So one cup of coffee, then I’ll go

२) “मी गेलो तर तू दुसरे लग्न करशील का? “
प्रश्न विचारणारा माझ्या जवळच्या मैत्रिणीचा नवरा. एका अपघातात आलेले परालंबीत्व नी आज् अनेक वर्षे बिछान्यावर खिळून होता. आपली नोकरी सांभाळून तिने मुलगा वाढविला. आता तो कमावता. ती जरा  स्थिरावलेली. जरा कुठे माणसांत मिसळायला लागली तर हा प्रश्न. 
या प्रश्नात “तू लग्न कर “अशी इच्छा नव्हतीच तर ती करेल याची थोडीशी भीती आणि कदाचित राग . जाताना आपले आहे ते सगळे गोळा करून जायचे. तो मालकी हक्क सोडू म्हणता सोडवत नाही.
“इतके केलेस तू माझ्यासाठी, एक नवरा म्हणून कुठल्याच कसोटीला मी उतरू शकलो नाही,, उद्या जर माझे काही झाले तर तू जग, आनंदाने जग “हा मनाचा मोठेपणा सोडाच पण तू करणारच नाही असा खुंटा हलवून घेणे.  आसक्ती आणि त्यातून निर्माण झालेला हक्क माणसाला केवढा स्वार्थी बनवतो! 
खरेतर आपले असतेच काय? नाव सुद्धा दिलेले असते.  चार माणसे आपल्याला घेवून जातात याची खरेतर कृतज्ञता वाटायला हवी पण त्या ऐवजी हे जग ते दुसरे भोगणार, आपल्या शिवाय याची असूया माणसांना वाटते. 
विरह हा सर्वच नात्याचा एक अविभाज्य भाग आहे. मग काही अपरिहार्य कारणामुळे असो किंवा मृत्यूमुळे, तो सहज स्विकारला का जाऊ नये? 


“For the good times”
By Perry Como
———————-

Don’t look so sad, I know it’s over 
but life goes on and this old world will keep on turning 
Let’s just be glad we had some time to spend together 
there’s no need to watch the bridges that we’re burning ….

पेरी कोमोचे हे गीत. ह्या गाण्याची पार्श्वभूमी माहित नाही. पण कदाचित नायकाचे शेवटचे दिवस असावेत. कदाचित त्यांचे वेगळे होणे अपरिहार्य असावे.
I’ll get along, you’ll find another, 
And I’ll be here if you should find you ever need me, 
Don’t say a word about tomorrow, or forever, 
There’ll be time enough for sadness when you leave me . . . 

कुठेही तिला अडवणे नाही, गुंतवणे सुद्धा नाही. आहे तो अटळ शेवटचा निरोप. 
तिचे वाईट व्हावे अशी इच्छाही नाही. उलट तिच्या नवीन आयुष्याला मनापासून शुभेच्छा आहेत त्याच्या. 
खरेतर No one is invincible …. पर्याय असतोच आणि ते मान्य करणे म्हणजे आपला रस्ता सुकर करत जाणे. 

Lay your head upon my pillow, 
hold your warm and tender body close to mine, 
Hear the whisper of the raindrops blowing soft across the window, 
And make believe you love me one more time, 
For the good times .

दोन एकमेकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचे हे गीत. करणे काहीही असो, विरह अटळ आहे. दोघांनाही हे मान्य आहे. एकदा जायला हवेच हे मनापासून स्विकारले तर गेलेल्या क्षणांकडे बघणे सोपे होते. कारण ते सुंदर असतात.
प्रेमभंग हा शब्दच मला पटत नाही. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असो व नसो, त्याच्या प्रेमात पडायचा निर्णय तुमचा असतो. ज्या क्षणाला तुम्ही त्याच्या प्रेमात पडता तो क्षण अद्भुत असतो. ती अनुभूती अद्भुत असते. ती हुरहूर, ते लाजणे, तो उल्हास, ती थरथर ..विचार करा, ती व्यक्ती जर नसती तर ते अनुभवणे कसे शक्य झाले असते!
काही अनुभव घेतल्याशिवाय आयुष्याचे सार्थक होत नाही. प्रेम होणे हा क्षणही तसाच. त्या क्षणांकडे कृतज्ञतेने पाहायला हे गीत शिकवते.

३) “ गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे “ आयुष्याच्या रहाटगाडग्यात माणूस एवढा गुंतून जातो की अनेक गोष्टी करायला हव्या असे वाटत असूनही राहून जातात. प्राधान्य कशाला द्यायला हवे हे जर समजले ना , तर कितीतरी प्रश्न सुटतील. माणूस कामात अडकतो, पैशाच्या मागे जीव तोडून धावतो, कशासाठी तर आपल्या कुटुंबियासाठी.
असते प्रेम, देतो काय तर पैसे. एकतर पैसे म्हणजेच प्रेम अशी समजूत करून देतो किंवा गैरसमज झाल्याने माणसांना दुरावतो. खरेतर पुढच्या क्षणाचा भरोसा नाही अशी स्थिती, अशी उदाहरणे आपण नेहेमी बघत असतो.
काळ आणि काळाबरोबर माणसे सुद्धा मिटल्या मुठीतून निसटून जातात.
राहतात ते न बोलले गेलेले शब्द.
क्लोजर करायचे राहून जाणे यासारखे दुर्दैवी काही नाही. 
“Tears in heaven “
By Erik Clapton
————————-

गायक एरीक क्लॅप्टन चे अत्यंत गाजलेले गाणे आहे.
त्याचा चार वर्षाचा मुलगा अपघातात गेला.
दुर्दैवाने तो त्यावेळी शहरात नसल्याने, मुलाला प्रेतगारात ठेवले गेले. त्याच्या मृत शरीराची ओळख पटवण्यासाठी एरीक गेला . त्याचा सुंदर चेहेरा ओळखीचा पण तोच होता ? चेहेरा परिचयाचा असला तरी त्यातील चैतन्य निघून गेल्याने अनोळखी. आता आपल्या मुलाला आपण काहीही देऊ शकत नाही , ना आयुष्य, ना वेळ , ना प्रेम याची खंत
“ tears in heaven “ या गीतात आहे.

Would you know my name
If I saw you in heaven?
Would it be the same
If I saw you in heaven?

I must be strong and carry on
‘Cause I know I don’t belong here in heaven
Would you hold my hand
If I saw you in heaven?
Would you help me stand
If I saw you in heaven?
I’ll find my way through night and day
‘Cause I know I just can’t stay here in heaven


जिवंत असताना कळत न कळत दुर्लक्ष केल्याची अपराधी भावना एवढी प्रखर आहे की आपल्याशिवाय तो सुखी असणार याची जाणीव या पुढील ओळीत दिसते. 

Beyond the door, there’s peace, I’m sure
And I know there’ll be no more tears in heaven

४) निरोप फक्त नात्यांचा नसतो, माणसांचा नसतो, निरोप वास्तूचा असतो, जिथे आयुष्य घालवले त्या शहराचा असतो. माणसे स्थलांतर करतात. विवाहानंतर घर बदलते, शिक्षणासाठी गेलेला मुलगा आपले घर दुसरीकडे वसवतो, पोटापाण्यासाठी माणसे घर सोडतात , शहर सोडतात , देश ही बदलतात. ज्याच्यावर प्रेम आहे ते सोडून जाणे कधीच सोपे नसते पण अनेकदा गरजेचे असते. प्रगती आणि विकास साधण्यासाठी अनेकदा ही पायरी ओलांडणे आवश्यक असते.
“ Leaving New York “ मध्ये  शहराला दिलेला निरोप आहे.

“ Leaving New York “
By Michael Stipe
ह्या गाण्याला एक ठोस पार्श्वभूमी आहे. गाण्याचे शब्द मात्र कुणालाही उमजतील एवढे वैश्विक आहेत. 

It’s quiet now and what it brings is everything
Comes calling back, a brilliant night, I’m still awake
I looked ahead, I’m sure I saw you there
You don’t need me to tell you now that nothing can compare

न्यू यॉर्क शहरात गायकाला प्रसिद्धी मिळाली आहे, यश, पैसे सारे काही या शहराने दिले आहे. ह्या शहरात घालवलेले अनेक सुखाचे क्षण आहेत, जीवलग आहेत. शहराचा प्रत्येक कोपरा त्याच्या परिचयाचा आहे. या शहरावर त्याचे प्रेम आहे, या शहराची त्याला सवय आहे. याच शहराने त्याचा प्रगतीचा आलेख लिहिला आहे.
मग का बरे त्याला या शहराचा निरोप घायचा आहे ?

९/११ ही ऐतिहासिक घटना आहे. दोन मनोरे पडणे, माणसे मरणे, आर्थिक नुकसान होणे एवढाच या घटनेचा परीघ नाही. ९/११ घडले आणि जग दुभंगले गेले. हा शहराच्या अहंकारावर वार होता, आम्ही सुरक्षित आहोत या समजुतीवर वार होता, दाखवलेल्या विश्वासाचा भंग होता.
शहर बदलले, चिडीचूप झाले , मोकळेपणा गेला, भयाचा अंधार दाटून आला.
शांततेत गेलेल्या लोकांचे आवाज त्रास देऊ लागले. त्यांच्या आठवणी, सोबतीने घालवलेल्या रात्री , एकत्र पाहिलेली ठिकाणे, केलेली मस्ती हे सारे आठवणीत जाऊन बसले. ओळखीचे शहर आता अनोळखी झाले.

गाण्यामध्ये गेलेल्या क्षणांचा शोक आहे पण गाणे तिथं थांबत नाही.
तो शहराला सांगतो, जे गेलेले आहे ते परत मिळणे शक्य नाही. आणि जे अनोखी झाले आहे तिथे मला थांबायचे नाही.
निघून गेल्यावर, उशिरा का होईना, दिलेला हा निरोप आहे.
तो शहराला सांगतो ,

You might have laughed if I told you
You might have hidden your frown 
You might have succeeded in changing me 
I might have been turned around

कदाचित तू माझा विचार बदलला असतास, कदाचित तू माझ्यावर हसला असतास, रागावला असतास आणि माझे पाय इथेच अडकले असते.
पण ते योग्य नव्हते.
It’s easier to leave than to be left behind
हा निरोप आवश्यक होता. माझ्यासाठी आणि कदाचित तुझ्यासाठीही.

आयुष्यातील अनेक गोष्टीसारखेच २०२३ सुद्धा काही तासात संपेल. उद्याचा सूर्योदय एका नवीन रस्त्याची आखणी करून देईल.
Life changes but my New Year wish for you remains the same-Wishing you happiness, smiles and hope for a beautiful journey of many more miles .
Cheers !

41 thoughts on “निरोपाची गाणी .”

  1. खरंच खूप सुंदर!!!
    विरह ; मग ते नात्यात असो, जागेशी( वास्तू) असो,शहर वा परिसर!!—दुःखदाई असते!
    खूप छान व्यक्त केलेत!🙏🙏❣️

    1. खरंय Swati.
      आणि निरोप कशीही विसरता येत नाही ..म्हणौन निदान आपल्याला उद्या अपराधीपण वाटू नये असा असावा

      1. अप्रतिम लिहिलंस. सिनेमा आणि गाणी यांचा केवढा अभ्यास आहे तुझा याचं कौतुक वाटतं. त्यातले योग्य ती रत्नं वेचून, त्यांना आपल्या शब्दांच्या सुवर्णकोंदणात बसवून सुरेख माळ वाचकाच्या ओंजळीत देताना त्यांचं मोल अधिक वाढवतेस. त्यासाठी आभार.

  2. खूप सुंदर… मनाला भिडलं… तसं तू लिहितेस ते नेहमीच भिडतं 🙏
    मला या निमित्ताने एक गाणं आठवलं.. आहे दिन बहारके मधलं
    विरह गीत आहे…पण जे शाप दिले आहेत त्या प्रेयसीला…बस..
    तू फूल बने पतझड का
    तुझपे बहार न आहे कभी
    दुस-या एका कडव्यात आहे ‘ किसीका प्यार क्या तू बेरुखी को तरसे ‘
    सहज आठवलं म्हणून 😊

    1. Thank you Dipti.
      अगदीच
      आपल्याकडे ग्रेसफुल होताच येत नाही .
      शिव्याशाप नाहीतर भोकाड .
      संवेदनशीलता आणि सहनशक्ती चा अभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत खरेतर

    1. Anchor Sujata Munot

      विरह फक्त माणसाचाच नसतो, जागेचा, शहराचा पण असतो…
      अनुभवतेय तीव्रतेने…
      आवडतं गाणं आठवलं…
      Country road take me home, to the place I belong,

  3. सगळ्या lyrics खूप छान! माहिती नव्हती ही गाणी. आवडली.

    1. आशालता ठोसर

      निरोप नेहमीच हळवे करतो. नसण्याची किंमत त्या क्षणीं कळते. तुझे व्यक्त नेहमी प्रमाणे वाचत रहावे असेच!

  4. प्रिया जियो 😘👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
    अतिशय सुंदर .
    लेख संपू नये,वाचतच राहावे असे वाटत होते.
    चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनो…

    अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव….
    लेख वाचताना या गाण्यांची आठवण आली

    1. ती गाणी राहिलीच .
      मराठीत आणि हिंदीत सुद्धा अप्रतिम गाणी आहेत ..बहुतेक पुढच्या वर्षी घालेन. Thank you Maddhuri.

  5. निरोपाला कडवटपणाची किनार नकोच… स्वतःसाठीही ते वाईट असतं. मस्त लिहिलंस.

  6. अप्रतिम, विलक्षण लिहिता प्रियादी तुम्ही ❤❤❤
    Wish you a very happy new year priya di❤

  7. खोल अंतःकरणात लेखणी बुडवून लेख लिहितेस…
    🥰

  8. कृतज्ञ निरोप देता येणं प्रत्येकाच्या बौद्धिक,भावनिक आवाक्यात नसतं.
    फार सुरेख लिहिलं आहेस,गाण्यांची निवड नेहमीप्रमाणेच अप्रतिम

  9. अतिशय सुंदर. अप्रतिम. गाणी तर व्वाह!!!!
    कृतज्ञ निरोप.. प्रत्येकाला नसेल जमत. तेवढी मानसिक प्रगल्भता लागणार ना त्यासाठी

  10. निरोप देणं अवघडच. माणसाला असो की एकत्र घालवलेल्या बऱ्यावाईट क्षणांना असो. तू फार नेमकं वर्णन केलंस.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *