Skip to content

“बता ये हुनर तुने सिखा कहा से “

शम्मी कपूर
पार्ट २ 
———
साल १९५५. राणीखेत येथे रंगीन राते या सिनेमाचे शूटिंग चालू होते. शम्मी समोर होती गीता बाली.  त्यावेळची प्रसिद्ध नायिका. शम्मीचा उमेदवारीचा काळ होता . निसर्गरम्य वातावरण आणि सिनेमात असलेली सुंदर गाणी. याच्या पार्श्वभूमीवर ती आली , तिने पाहीले , ती जिंकली … आणि हा पठ्ठ्या सफ़शेल उताणा पडला. 
तिथल्या तिथे त्याने मागणी घातली . तीन चार महिने नेट लावून धरला आणि गीता प्रसन्न झाली . घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पहाटे चार वाजता बाणगंगेला लग्न केले दोघांनी आणि मग घरच्यांचा आशीर्वाद घेतला. 
कुठेही लपवाछपवी नाही.  मागणी सुद्धा सरळसोट.
“मी आहे हा असा आहे, Will you marry me ? ” 
खात्री आहे तिने होकार दिल्यावर त्याने” याहू” अशी डरकाळी फोडून पुजाऱ्याला पहाटे उठवून लग्न केले असणार . 
In his cinemas, Shammi  not only praised his heroines, he cherished them, pampered them, revered them, loved them, wooed them, worshiped them, and finally won them.
शम्मीची प्रेमकहाणी त्याच्या सिनेमा एवढीच साधी .

चित्रपटसृष्टीत नायकाला जिथे नायीकेकडून “अब हमें आपके कदमोंमे युं रहना होगा” हे गाणे ऐकायची सवय आहे त्या जमान्यात शम्मी “एहसान तेरा होगा मुझपर ,दिल चाहता है वो कहने दो ” सहज सांगून गेला.
कृतज्ञ प्रेमाचे पुरुषाचे दुसरे गीत माझ्या नजरेत नाही.
ही पोस्ट आहे ती शम्मीच्या वर चित्रित झालेल्या द्वंद्वगीतांची.

“तुमसा नही देखा” या सिनेमाने शम्मीच्या यशाचा मार्ग मोकळा झाला. अत्यंत आकर्षक रूप आणि उत्स्फूर्त अभिनय यामुळे त्याची आधीच्या प्रस्थापित नायकांपेक्षा एक वेगळीच इमेज तयार झाली.
ठेक्यावर असलेले त्याचे प्रभुत्व, नृत्यातील सहजता, आत्मविश्वासाने नायिकेला वश करणे आणि खलनायकाची पिटाई सुद्धा तेवढ्याच सहजतेने करणे , त्याचे कॉमिक टायमिंग यामुळे पन्नाशीच्या आणि साठीच्या दशकात त्याने स्वतःचे स्थान पक्के केले.  त्याची बिनधास्त छबी, स्टायलिश कपडे ,सणसणीत उंची, सशक्त, दणकट शरीर , मिस्कील हसू, पुरुषी गुर्मी आणि  मधाळ डोळे याने महिला वर्गांच्या हृदयात त्याने जागा मिळवली. He had a kind of animal grace that stood him in good stead.
Kapoor in Tumsa Nahin Dekha is drop-dead gorgeous.

“तुमसा नही देखा” हा रोमँटिक सिनेमा होता आणि त्याला साजेशी त्याची गाणी होती.
कपूरच्या यशात ओपी नय्यर , शंकर जयकिशन, मोहम्मद रफी , आशा भोसले यांचेही योगदान आहे असे म्हंटले तर चुकीचे नाही.

सिनेमाचा नायक शंकरचे पालनपोषण त्याची आई करते. वडील जुगारी असतात आणि कायद्यापासून पळ काढताना, त्यांनी आपल्या मुलाचा आणि पत्नीचा सुद्धा त्याग केलेला असतो. पुढे ते आसाम मध्ये जातात, तिथे कष्ट करून भरपूर पैसे मिळवतात आणि खूप वर्षांनी त्यांना आपल्या पत्नीची आणि मुलाची आठवण आल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देतात.
त्यांना प्रतिसाद मिळतो पण एक नाही तर दोन दोन शंकर त्यांच्यापुढे उभे राहतात.
या सर्व रहस्याच्या नाट्यात एका सुंदर तरुणीचा प्रवेश होतो आणि  सुमधुर संगीताची निर्मिती होण्यास वाट मिळते.

१)सर पर टोपी लाल, हाथ में रेशम का रुमाल
ओ तेरा क्या कहना
(सिनेमा -तुमसा नही देखा, संगीत -ओपी नय्यर, सह नायिका -अमिता, गायक -रफी -आशा भोसले)

शम्मी हा बॉलीवूड चा पहिला डान्सिंग हिरो होता. ह्याच्या आधीच्या नायकाचे व्यक्तिमत्व गंभीर होते. आदर्शवादी, जगाचा भार स्वतःच्या डोक्यावर घेणारा पुरुष हा नृत्य कसे काय करणार! नाही म्हणायला राज कपूर च्या मूड मूड के ना  देख  मूड मूड के, किंवा रमैय्या या गीतांत नृत्याला थोडीशी जागा आहे  पण त्यातही नृत्याच्या पदलालित्या पेक्षा गीताच्या शब्दांना महत्व होते. चेहेऱ्यावरील हावभाव आणि हाताच्या हालचाली यांना प्राधान्य होते.
शम्मीचे “ सर पर  टोपी लाल, हाथ में रेशम का रुमाल “ हे नृत्याला प्राधान्य देणारे गीत आहे.
ती म्हणते,
हो ये क्यों दिल पे हाथ है
वह क्या ऐसी बात है, हमें भी बताइए

ह्या गोरापान, देखण्या पुरुषाचे कितीही आकर्षण वाटले तरीही ती सावध आहे, त्याच्या पासून थोडी हातभार लांबच.
थोडीशी छेडछाड तर तीही करते. नाही म्हंटले तरी त्याच्या हृदयात काय आहे याची उत्सुकता आहेच तिला.
त्याच्या आकर्षणाच्या कक्षेपासून लांब जाण्याचा तिचा प्रयत्न त्याने ओळखला आहे. ती आपल्या प्रेमात आहे हे सुद्धा तो जाणून आहे.
पण भोळेपणाचा आव आणून तो सांगतो, 
औ भला इतनी दूर से कहूँ क्या हुज़ूर से
मेरे पास आइए

सुरुवातीला त्याच्या हालचाली नृत्याच्या कह्यात आहेत पण गाणे संपता संपता, जशी लय वाढते, तसा  शम्मी रंगात येतो.
एका पायावर नाचणे, इतर कलाकारांबरोबर स्टेप्स मिळवणे , त्याच बरोबर गिरक्या घेणे , ओ सद के, बलिये हे गातानाच पूर्ण शरीर लयीत फिरवणे …
He danced with great abundance.
असा नायक प्रेक्षकाने पहिल्यांदाच पाहिला.

“तुमसा नही देखा” या सिनेमाने शम्मीला चित्रपटसृष्टीत प्रस्थापित केले तर दिल देखे देखो या सिनेमाने त्याला रोमँटिक कॉमेडी हिरोच्या रूपात प्रचंड यशस्वी बनवले. नासिर हुसेनचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट.
इस्टेटीच्या लोभाने, खऱ्या वारसाबरोबर   केलेल्या फसवणुकीची ही  गोष्ट. अर्थात शम्मी असला की ती तशी गंभीर , दुःखभरी होत नाही. शेवट अर्थातच नायकाला लक्ष्मी मिळतेच आणि त्या बरोबर गृहलक्ष्मी सुद्धा.
शम्मीच्या पुढल्या सिनेमांचा हा ट्रेडमार्क फॉर्मुला ठरला.
सिनेमाची सुरुवातच एका गैरसमजातुन होते.
हरिचंद आणि राणा रघुवीर यांची मैत्री असते. हरिचंदचा मृत्यू होतो. त्याच्या प्रेताच्या शेजारी एक पत्र मिळते. राणाची  बायको, यमुनाबरोबर  त्याचे अनैतिक संबंध असल्याचा त्यात उल्लेख असतो. ते वाचून राणा खचतो , हादरतो. आपल्या पत्नीचे काहीही ऐकून न घेता, तो आपल्या मुलाला घेऊन निघून जातो.
हाच मुलगा (रूप) पुढे आपल्या आईच्याच हॉटेलमध्ये ड्रमर म्हणून नोकरी पत्करतो. आई आणि मुलाला मात्र त्यांचे नाते माहिती नसते. रूपची ओळख इथेच निशा बरोबर होते , त्याचे रूपांतर पुढे प्रेमात होते.
थोडेसे रहस्य असलेली ही प्रेमकथा सुपर हिट झाली.

२)बडे है दिल के काले,  आ यही नीलीसी आँखों वाले
(सिनेमा-दिल देखे देखो, संगीत-उषा खन्ना, गीतकार-मजरूह सुलतानपुरी, सहनायिका-आशा पारेख, गायक-रफी,)

जेवढा दाखवतो तेवढा साधा नाही याची कल्पना आहे तिला पण तरीही ते निळे डोळे नजरेआड होत नाहीत. ते सुप्त आकर्षण आहेच आणि तरीसुद्धा मी तुला चांगलेच ओळखले आहे  अशी ” बडे है दिल के काले ” ही गर्भित सूचना सुद्धा आहे .जे जे अप्राप्य त्याचे आकर्षण असतेच का ? आणि ते मिळवायचे आव्हान सुद्धा. 
flirting जर एका बाजूने असेल तर मजा येत नाही …
Its always a battle of wits for both .त्यामुळे, Here gender doesn’t matter .

जैसे भले हो सब है खबर
शेर-ओ-शरारत की ये नज़र..
साधेपणाचे सोंग आणू  नकोस, तुझ्या नजरेतला खट्याळपणा मी ओळखून आहे. मिस्कील धमकी असली तरी तिला राग आला नाही याची कल्पना आहे त्याला . 
असता तर नजरेतला खट्याळपणा ओळखण्यासाठी तिने नजरच भिडवली नसती न!

आँखों में आँखें डालके हम
हो गये अब तो जाने जिगर
“हे ओळखण्यासाठी तू नजरेला नजर दिलीस न मग त्यातून माझ्या हृदयाची भाषा समजली की तुला”  हे त्याचे प्रत्युत्तर .
तुम्हाला माहिती आहे ? When flirting is harmless, it is relaxing. After all  ” Flirtation” is . “Attention without Intention.”.

मरना मेरी ज़िंदगी है दीवाना हूँ प्यार का
तुम भी एक दिन आज़माँ के देखो तो ज़रा….Now this is a challenge .Will she accept it?

असे म्हणतात, मुंबई कधीच झोपत नाही. रात्री लाखो दिव्यांनी हे महानगर झगमगत असते. अशावेळी हातात हात घेऊन फिरायला जावे. आजूबाजूला अनेक वेडे असतात. तुमच्यासारखे. रात्रीच्या चांदण्यात रस्ते पालथे घालतात ते आपल्या चांदणीबरोबर.  
शम्मी (श्याम) तर पॅरिसला पोचलाय. पॅरिसला प्रेमाचे शहर म्हणतात. इथेच तो रूपा (शर्मिला टागोर)ला भेटतो, तिच्याशी वाद घालतो, भांडतो आणि तरीही तिला पटवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतो. शेवटी त्याला पॅरिस फळते.

३) रात के हमसफ़र, थक के घर को चले
झूमती आ रही है सुबह प्यार की
( सिनेमा- an evening in Paris, संगीत -शंकर जयकिशन, गीतकार-शैलेंद्र, सहनायिका-शर्मिला टागोर, गायक -रफी -आशा )


प्रेमिकेच्या हातात हात गुंफून, निर्मनुष्य रस्त्यावर, चंद्राच्या साक्षीने आणि ताऱ्यांच्या सोबतीने फिरण्याएवढे दुसरे काय रोमँटिक असेल! 
मदभरी, जादुई रात्र आणि त्यात स्वतःचे भान विसरलेले दोन जीव. उजाडणाऱ्या दिवसाची कुणाला पडली आहे!

क्या क्या वादे हुए किसने खाई कसम,
इस नयी राह पर हमने रखे कदम
छुप सका प्यार कब हम छुपाएँ तो क्या,
सब समझ पा रही है सुबह प्यार की

प्रेमाची वाट तशी निसरडी आणि नागमोडी. पावला-पावलाला परीक्षा घेणारी पण याच वाटेवरून किती प्रेमी जातात, टिकतात आणि तरतात सुद्धा. तेव्हाच सप्तपदी पूर्ण होते. पॅरिस शहराची आणि तेथे राहणाऱ्या लोकांची गोष्ट वेगळी. पहाट होईपर्यंत फिरायला कोणी बंदी नाही घालत. आपल्याकडे जरा अवघड आहे.

३) इशारों इशारों में दिल लेनेवाले
(सिनेमा-कश्मीर की कली, संगीतकार-ओपी नय्यर, गीतकार-एस एच बिहारी, रफी -आशा भोसले, सहनायिका -शर्मिला टागोर)

शम्मी हा  खूप श्रीमंत घराण्याचा वारस. वडील गेल्यानंतर व्यवसायाची धुरा त्याच्याकडे सोपवली आहे.
मिल मजदुरांसाठी तो बोनस जाहीर करतो आणि पैशालाच महत्व देणारी त्याची आई हादरते. आता एवढ्या मोठ्या मुलाला ती कशी काय वठणीवर आणणार ! हे काम तर एखादी तरुण मुलगीच करू शकते. त्याचे लग्न करायचे ठरवतात. अट एकच. मुलगी अत्यंत श्रीमंत घराण्यातील असावी.
शम्मीच तो . थोडेच ऐकणार ! तो घरातून पळ काढतो आणि थेट काश्मीर मध्ये येतो आणि इथे त्याची ओळख चंपाशी होते.
ओळख पटणे ही पहिली पायरी आणि नंतर सुरु होतो हा संपूच नये असा वाटणारा प्रवास. रोमान्सची नक्की व्याख्या मला नाही सांगता येणार. मध्ये एका मैत्रिणीने रोमान्स कसा असावा ह्या बाबतीत मार्गदर्शन करा अशी पोस्ट टाकली होती.“कसाही असूदे पण त्याला पर्सनल टच दे ग” असे सांगितले होते मी तिला .

फुले, केक्स, चॉकलेट्स हे सर्व रोमांचित करत असतीलही पण सगळ्यात रोमांचक आहे तो हातात हात घालून केलेला प्रवास.जर हवा असणारा हात हातात असेल तर साधा डांबरी रस्ता सुद्धा फुलांच्या पायघड्या पांघरून येतो.
आता शम्मी तर खूप श्रीमंत घराण्याचा वारस आणि कसल्याही वाईटाचा स्पर्श न झालेली ती निरागस निसर्गकन्या.इथे शम्मी हा नेहेमीचा जंगली शम्मी नाही. तो तिचा पुजारी आहे,
अचानक आलेल्या वळणावर मिळालेली ही प्रीती आणि तो त्याबद्दल कृतज्ञआहे .

There is a sense of awe that they have found each other .
ती म्हणते, 
इशारो इशारो में दिल लेने वाले ,
बता ये हुनर तुने सिखा कहा से .

“बता ये हुनर तुने सिखा कहा से “
“अशी हृदयाची चोरी करायला कोणी शिकवले तुला?”तिचा थोडासा खट्याळ, थोडासा निरागस प्रश्न .
जिथून तू नजरेने भूल घालायला शिकलीस, तिथलाच तर मी विद्यार्थी आहे.
त्याचे उत्तर. 
त्याची धिटाई पाहून ती हळूच दटावून म्हणते,

मुहब्बत जो करते हैं वो, मुहब्बत जताते नहीं
धड़कने अपने दिल की कभी, किसी को सुनाते नहीं
एवढे पुढे आल्यावर आता मागे जायची त्याची तयारी नाही. तिच्या शब्दांचा मान राखून सुद्धा तो आपले प्रेम व्यक्त करतो.

माना की जान-ए-जहां,लाखों में तुम एक हो
हमारी निगाहों की भी, कुछ तो मगर दाद दो
बहारों को भी नाज़ जिस फूल पर था, वही फूल हमने चुना गुलसितां से

तुझे सगळे बरोबर असेलही पण जिथे निसर्गाने सुद्धा ज्या फुलाला दाद दिली आहे त्यालाच माझ्या डोळ्यांनी ओळखले, निदान त्याचे तरी तू कौतुक कर . धुक्यात लपेटलेला निसर्ग, लाजाळू शर्मिला आणि ओपीची मधुर मेलडी .
कश्मीर की कली चे अजून एक डुएट फार सुंदर आहे .
४) दिवाना हुवा बादल
((सिनेमा-कश्मीर की कली, संगीतकार-ओपी नय्यर, गीतकार-एस एच बिहारी, रफी -आशा भोसले, सहनायिका -शर्मिला टागोर)

ओपीचे उत्कृष्ट संगीत, रफी आणि आशा यांचा स्वर, “बरसों से खिज़ां का मौसम था,
वीरान बड़ी दुनिया थी मेरी,हाथों में तेरा आँचल, आया जो बहार आई” या सारखे एस एच बिहारी यांचे हळुवार शब्द, शम्मी आणि शर्मिला सारखे देखणे चेहेरे,  बहरून आलेला निसर्ग आणि काश्मीरच्या सरोवरात निवांत विसावलेले दोन जीव ..याहून रोमँटिक अजून काय असेल !
आपल्या मनात दडलेल्या भावनांचा पहिल्यांदाच उच्चार करताना ती म्हणते,

जब तुमसे नज़र टकराई सनम
जज़्बात का इक तूफ़ान उठा
तिनके की तरह मैं बह निकली
सैलाब मेरे रोके न रुका
जीवन में मची हलचल, और बजने लगी शहनाई
ये देखके दिल झूमा, ली प्यार ने अंगड़ाई
दीवाना हुआ बादल

फक्त पैसे हेच सर्वस्व असलेल्या त्याच्या जगात प्रेम असे असते हे तर त्याला नवीनच. त्याच्यासाठी तिच्याबद्दल फक्त प्रेमच  नाही तर या सुंदर जगाशी ओळख करून दिली म्हणून कृतज्ञता सुद्धा आहे. 
है आज नये अरमानों से, आबाद मेरी दिल की नगरी
बरसों से खिज़ां का मौसम था, वीरान बड़ी दुनिया थी मेरी
हाथों में तेरा आँचल
आया जो बहार आई
ये देखके दिल झूमा
ली प्यार ने अंगड़ाई

५) रात यूँ दिल में तेरी खोई हुई याद आई”
(सिनेमा-जानवर, संगीत -शंकर जयकिशन, गीतकार -फैज अहमद फैज, सहनायिका-राजश्री, गायक -रफी -आशा)

जानवर सिनेमाच्या पहिल्या भागात शम्मी जंगलीच आहे. थोडासा आक्रस्ताळा.
मर्यादा सोडून वागणारी व्यक्तिरेखा. नंतरच्या भागात मात्र त्याची व्यक्तिरेखा गंभीर होत जाते.
एका श्रीमंत  उद्योगपतीच्या दोन मुलांची ही गोष्ट. वडील अत्यंत हेकेखोर. त्यांच्या आज्ञेत मोठा मुलगा आहे. वडिलांची इच्छा आहे की तोलामोलाच्या घराण्यातील मुलगी आपल्या घरात सून म्हणून यावी पण याचे तर एका गरीब मुलीवर प्रेम आहे. वडिलांची आज्ञा  तो टाळू शकत नाही आणि प्रेम तर विसरता येत नाही . शेवटी तो दारूच्या नशेत सापडतो . 
धाकटा सुंदर . (शम्मी )
त्याचेही एका गरीब मुलीवर प्रेम आहे आणि आपल्या निर्णयावर तो ठाम आहे.
साधी सरळ माणसे पण मात्र गुंतागुंतीच्या वळणाने जाते . शेवट मात्र सुखांत .

“रात यूँ दिल में तेरी खोई हुई याद आई” हे गीत नाही, ही कविता आहे. ती कवितेसारखीच गायली  आहे. वाद्ये नाहीच. हलक्या स्वरांत केलेली सुरेल कुजबुज आहे ही.

रात यूँ दिल में तेरी खोई हुई याद आई”
जैसे वीराने में चुपके से बहार आ जाए
जैसे सहराओं में हौले से चले बाद-ए-नसीम
जैसे बीमार को बे-वज्ह क़रार आ जाए

तो सांगतो,
काल अचानक तुझी आठवण आली आणि माझ्या एकाकी जीवनात वसंत फुलून आला.
वाळवंटात अचानक हवेची झुळूक यावी तास सुख देणारी अनुभूती.
शम्मीच्या प्रेमात सुद्धा ऊर्जा आहे. तो कधी शांत पाहिला आहे का तुम्ही . उत्साहाने सळसळणारा शमी इथे मात्र शांत आहे. प्रेम मात्र त्याच्या  डोळ्यात आहे , भावनांनी ओथंबलेल्या त्याच्या शब्दात आहे, त्याच्या थरथरणाऱ्या ओठांत आहे. त्याच्या डोळ्यातली आतुरता मात्र सांगते आहे की तो आकंठ प्रेमात बुडालेला आहे.
त्याची भावना खरी आहे  आणि महत्प्रयासाने रोखून धरलेले  आकर्षण सुद्धा तितकेच खरं आहे.
अशा पुरुषाच्या सहवासात शब्द सुचणे सुद्धा नायिकेची कमाल आहे.

जंगली , प्रोफेसर , राजकुमार ह्या सर्वच सिनेमात शम्मी वर चित्रित फार सुरेल द्वंद्वगीते आहेत पण येत्या दिवसांत आशाताईंचा वाढदिवस आहे . त्यामुळे ही पोस्ट त्यांच्या गीतांची सुद्धा .

यातले अजून एक फार सुरेल गीत आहे.
शम्मी आणि नूतन ही फार वेगळी जोडी आहे. मुळात शम्मीच्या सिनेमात सबकुछ शम्मी असे असताना या सिनेमात नूतनला अतिशय तगडा रोल आहे.
सिनेमा सुरुवातीला विनोदी आणि नंतर गंभीर वळण घेतो.
हॉलीवूड च्या “It  happened one night “ आणि “ an affair to remember “ ह्या दोन सिनेमांची ही कॉपी आहे.
सिनेमा शेवटी रटाळ होत जातो पण हे गाणे फार सुंदर आहे.

एका श्रीमंत माणसाची लाडावलेली मुलगी आपल्या इच्छेने लग्न करण्यासाठी घर सोडून पळून जाते. प्रवासात तिची ओळख आपल्या नायकाशी होते. सुरुवातीचे गैरसमज , भांडणे , अहंकार हळूहळू संपतात आणि दोघांच्या मनात प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते .
नायकाच्या मनात मात्र शंका आहे . ही आपल्या पहिल्या प्रियकराला विसरली , आपल्याला विसरली तर ! शेवटी ठरते की अजून एक महिन्याने भेटायचे . जर ही भावना तशीच राहिली तर आयुष्याचा रस्ता सोबतीने  एकत्र पार करायचा. त्या वळणावरच हे गीत .

६) चोरी चोरी एक इशारा हो गया है
(सिनेमा-बसंत, संगीत -ओपी नय्यर, गीतकार-कमर जलालाबादी  , सहनायिका -नूतन, गायक-रफी -आशा )

एकदा स्वतःच्या मनाची खात्री पटली की मनातलय भावना शब्द बनून ओठावर येतात.
तो सांगून  मोकळा होतो.

खूब सुन रखे थे मजनू के फ़साने
उसको तड़पाया था लैला की अदा ने
चोरी चोरी एक इशारा हो गया है
दिल हमारा था , तुम्हाऱा हो गया है

खरेतर कुणावर असलेल्या प्रेमापायी ती आपल्या वडिलांचे घर सोडून निघाली आहे पण आता मात्र तिचे मन मात्र तिलाच फितूर झाले आहे. या देखण्या अनोळखी माणसाच्या कह्यात गेले आहे.
अर्थात तिलाही तेच हवे आहे पण स्त्री सुलभ लज्जा  आडवी आल्याने ती काही त्याच्यासारखी उघड बोलत नाही.
आडवळणाने ती त्याला सांगते,

फिर वही किस्सा दुबारा हो गया है
दिल तुम्हारा था तुम्हारा हो गया है

Disclaimer:Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots  posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their origin.









2 thoughts on ““बता ये हुनर तुने सिखा कहा से “”

  1. शम्मी कपूर हिंदी सिनेसृष्टीतील अवखळ, रांगडा तितकाच मनस्वी नायक! त्याचे डोळे कमालीचे बोलके. खरंतर घारे डोळे बेरकी असतात असं म्हटलं जातं पण शम्मी त्याला अपवाद ठरावा. कमालीचे नितळ, आर्जवी नजरेने बोलणारे डोळे…नायिकेला आपल्या केवळ इशाऱ्याने होकार द्यायला भाग पाडणारे..
    ओपी, आशा, रफी आणि पडद्यावर शम्मी हे खूप फेवरेट समीकरण होतं त्या काळातील. बरेचदा काय होतं एखाद्या नायकाच्या देहबोलीवरून शिक्कामोर्तब होतं ,तसंच शम्मीच्या बाबतीत घडलं आणि चुलबुला, गंमत्या म्हणूनच ओळख तयार झाली..वास्तविक अतिशय संयत, समजून उमजून अभिनय करणारा हा अभिनेता! वर आलेलं सगळं विवेचन हीच बाजू अधोरेखित करतं!
    कमालीचं सुरेख लिहिलंय प्रियादी!
    एकेक गाणं आणि त्यावरील तुमचं लिखाण अगदी वाचत रहावं असं..
    तुम्हालाच विचारते “बता यह हुनर तुमने सीखा कहांसे?”😍😃

  2. प्रिया,

    कामिनी प्रमाणे मी पण विचारते,
    “बता ये हुनर तूने सिखा कहांसे?”

    भन्नाट लिहितेस.

    रांगडा शम्मी खूप च आवडता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *