ऐन नवरात्रात सहामाहीची परीक्षा चालू होती. अर्धे अधिक पेपर्स झाले आणि आला दसरा. हा एकच दिवस युनिफॉर्म नसायचा. नवीन कपड्यात नटून थटून जायची संधी वर्षातून एकदाच मिळत असल्याने, पेपर्सची टांगती तलवार डोक्यावर असली तरी कुणीच बुट्टी मारली नव्हती. त्यात हे शेवटचे वर्ष.
सगळ्याच मुलींनी ठरवून साडी नेसली. शाळेत शिक्षकांना सोने देऊन पाय वळले ते पार्कात. देवी नवमीलाच उठली असली तरी मूर्तीचे विसर्जन संध्याकाळी होते. हा दर वर्षीचा शिरस्ता होता. देवीदर्शन निमित्त, मूळ हेतू, साडी नेसलीच आहे तर मिरवण्याचा.
मंडपात खुर्च्या आपल्याला हव्या तशा वळवून ग्रूपने आपापले अड्डे जमवले होते. त्यांचा ग्रूप मंडपात आला मात्र आणि कोपऱ्यातल्या एका ग्रूप मध्ये खसखस पिकली.
“ साडी बघ , ऐकत नाही “ वळलेल्या माना बघताक्षणी तिने मान विरुद्ध दिशेला फिरवली.
“ तू हसते आहेस “ मैत्रीण कानात कुजबुजली.
“ काहीही काय, मी कुठे हसतेय आणि हसू नको तर रडू कशाला? माझा अभ्यास झालाय“ चेहेरा कोरा ठेवण्याचा निष्फळ प्रयत्न करत ती खेसकलीच .
“ हो, माहित आहे. तुझा चेहेरा लाल झालाय आणि तू गडबड केलीस ना, कुणी सांगितले तर मार्क कापतील आणि या वर्षीचे बेस्ट गर्ल स्टुडन्टचे बक्षीस आपल्या तुकडीतून जाईल. साठ रुपये गमावशील. तुला वि स वाळिंबेची पुस्तके घायची आहेत ना?
“ए वाळिंबे काय, अहो म्हण, मोठे लेखक आहेत ते “
“ मोठी आलीस. विषय बदलणारी. डोळ्याच्या कोपऱ्यातून तिकडे अजिबात बघू नकोस , कळतेय ते “
कौन कहता है मोहब्बत की ज़बाँ होती है
ये हक़ीक़त तो निगाहों से बयाँ होती है
“ कुठे बघू नको सांगतेयस ग तिला? ज्याला बघायचे आहे तोच चालत येतो आहे बघ!” ग्रूप मध्ये हशा फुटला. गपकन डोळेच मिटले तिने.
वो न आए तो सताती है ख़लिश सी दिल को
वो जो आए तो ख़लिश और जवाँ होती है
“ उठ आता, तरी सांगत होते, बघू नकोस. आता उठ आणि सोने देऊन पटकन ये. बडबडत बसू नको. लवकर जा ग , नाहीतर ते ध्यान येईल इथेच”
“ ध्यान काय! “ न राहवून ती बोललीच आणि परत मुलींनी तोंडावर हात धरला.
साडी सावरून उठताना कानावर पडलेच, “ काय बाई तरी, भाषणे कसली तर चेन्नम्मा , अमेलिन पँखर्स्ट आणि काय काय! खाली मुंडी पाताळ धुंडी कुठली “
तो आणि त्याचा मित्र आता जेमतेम दहा पावलांवर उभे होते.
रूह को शाद करे दिल को जो पुर-नूर करे
हर नज़ारे में ये तनवीर कहाँ होती है
“ दसऱ्याच्या शुभेच्छा” त्याचा मित्र बोलला. शेजारचे ध्यान गप्पच होते.
थरथरत्या हाताने तिने आपल्या छोट्याश्या पर्स मधून पाने काढली.
आता पिनड्रॉप सायलेन्स होता. पंधरा सोळा डोळ्यांच्या जोडया एकटक पाहत होत्या.
“ उद्याचा अभ्यास झाला का ? “ त्याच्या मित्राला हसूच फुटले पण तिला मात्र हुश्श झालं. विषय तर मिळाला बोलायला.
सुटलीच ती.
.” हो तर, मॅथ्सच प्रश्नच नाही रे, कधीच झालाय, मला न भूगोलाचे जाम टेन्शन आलेय. अजिबात आवडत नाही आणि काहीच वाचले नाहीय ..ब्ला ब्ला ब्ला “
आता समोरचे डोळे हसत होते.
ज़ब्त सैलाब-ए-मोहब्बत को कहाँ तक रोके
दिल में जो बात हो आँखों से अयाँ होती है
“अभ्यास झाला नसेल तर ट्रिपला जाऊ नकोस ना. सर बहुतेक प्रिलिम घेणार आहेत. मी तर जात नाहीये”
हा काय परीक्षा घेतोय की काय माझी. तिच्या मनात आले.
दहावीचे वर्ष आणि ट्रिपला जायचे नाही! एवढा स्वार्थत्याग करण्याइतपत कुठे काय झालेय!
“ ए, चेष्टा करतोय ग, तुला कसला एकटे जायला देणार तो. तेही आम्ही जात असताना”
पाठून कुणीतरी गायला सुरुवात केली . “ तुमने किसकी जान को, जाते हुए देखा है?”
हसू दाबत ती वळली तर कोरस “ वो देखो तुझसे रूठ कर ‘तेरी जान जा रही है “
“चला निघूया का, झाला न साजरा दसरा ? “मैत्रिणीच्या चेहेऱ्यावर बक्षीस गेल्याचे दुःख साकळून आले होते.
“ काय झाले , दोन शब्द बोलले तर! थोडेच कुणी सांगणार आहे आणि सांगितले तरी काही होणार नाही. सोने द्यायचेच असते ना आज. “
“ सोनेच दिले असते तर वेगळे , काय काय दिलं आहेस ते महिषासुर मर्दिनी बघते आहे डोळे मोठ्ठे करून. हसू नकोस. “
कुंकुवाने भरलेल्या ताटातले कुंकू कपाळावर टेकवताना, तिला मात्र आज देवीचा चेहेरा सुद्धा हसरा वाटत होता.
पंचवीस वर्षानंतर
———————-
“दोनपर्यंत पोचते रे. मीटिंग आहे. आटपून येते”
ते सात शब्द लिहून सात तास उलटले होते. मोबाईलच्या स्क्रीनवर उठलेल्या त्या शब्दांकडे गेल्या सात तासांत त्याने कितीवेळ पहिले असेल त्याचा हिशोब नव्हता. ट्रॅफिकमध्ये अडकलो तर, तिच्याबरोबर घालवायला मिळणाऱ्या मिनिटांची काही मिनिटे कमी होतील म्हणून अर्धातास आधीच पोचला तो. निवांत बसायला कॉफी शॉप सारखे दुसरे काही नाही. अडीचशे रुपये भरून एक खूर्ची अडवून ठेवायची. त्या कॉफीकडे नुसते पाहत बसले तरी कुणी उठवायला येत नाही.
आज पहिल्यांदाच घड्याळ त्याच्या वेगाबरोबर चालत नव्हते. प्रेमाच्या शब्दकोशातील पहिला शब्द “प्रतीक्षा“ असावा. तिने येते म्हंटल्यापासून किती गोष्टी तो मनाशी ठरवत होता. काय बोलायचे, काय सांगायचे, थोडे रागवायचे आणि तिने सॉरी म्हणायच्या आत तिचा हात पकडून स्वतःच सॉरी म्हणायचे. दिवस नुसता विचारातच पुढे सरकत होता. उगीच हुरहूर लागून राहिली होती.जितका उशीर तितका ताण. नुसता ताणच नाही तर गळ्यात आवंढा सुद्धा.
खरेतर इतक्या वर्षानंतरची ही पहिली भेट नव्हती. अनेकांच्या गराड्यातले एक होऊन भेटले होते ते. तेव्हाही ती छान बोलली होती. ना राग, ना खंत. डोळे मोठ्ठे करून ‘हॅलो स्कॉलर’ म्हणून तिने जेव्हा हात पुढे केला तेव्हा त्याच्याच गळ्यात आठवणींचा कढ जमा झाला होता. ती मात्र होती तशीच होती. खळखळून हसणारी, भारंभार बोलणारी.
डोळ्याला डोळे भिडवून बोलायची जुनी सवय तिची. तिचे ते सगळ्यांशीच खळखळून हसणे त्याला असुरक्षित करायचे.
“तुला मुलगी म्हणून वागता येत नाही ग”
“कमाल आहे, माझ्या मनात जे नाही तर डोळ्यात कसे काय उमटणार रे! ज्यांच्या मनात चोर असतो ना, ते नजर चुकवतात”
“माझी कुठे चुकवतेस ? “
“ चोरले आहेस तू , तर मी कशाला चुकवू ?”
मग डोळे मोठ्ठे करून एकटक बघत बसायची.
“ज्याची पापणी हलेल ना,तो खोटा “
खोटा तोच होता. काही मोह टाळता येत नाही असे आपण आपले समाधान करून घ्यायचे, पकडल्यावर सांगायचे उत्तर असते ते. दोन्ही बाजूचे लोणी खाणारी माणसे असे कुणाबद्दल बोलताना एवढी चिडून बोललेली!
तिने मात्र उत्तर द्यायची सुद्धा संधी दिली नव्हती.
बाहेरील वातावरण अवेळी कुंद झाले होते आज. निसर्गाचा सुद्धा मूड गेला असावा. नुसते मळभ जमून आले होते. त्याचीही घुसमट होत असेल का! आकाशातील काळ्या कभिन्न , वाकलेल्या ढगाचे पाणी आता त्याच्या डोळ्यात जमायला लागले.
कभी तो खुल के बरस अब्र-इ-मेहरबान की तरह
मेरा वजूद है जलते हुए मकान की तरह
आता एकदाची ये आणि बरसून जा. इतक्या वर्षाचे साठलेले, मनात राहिलेले. आता तरी त्याला वाट मिळू दे.
तापलेल्या मनावर, थकलेल्या देहावर फुंकर घालायला तरी एकदा येऊन जा ग. .
कित्येक दिवसांनी उगवलेली ही दुपार वेगळी होती. थोडासा गारवा, थोडीशी शिरशिरी. केवळ तो दिसण्याच्या कल्पनेनेच आकाशानेही श्वास रोखला होता.
अस्वस्थ, हातातला ग्लास न्याहाळणाऱ्या त्याला पाहून तिच्या मनात आले, स्वस्थ बसून वाट पाहणे हे पुरुषासाठी तरी अतिशय त्रासदायक काम आहे. बायका तर ते नेहेमीच करतात.
“किती वेळ वाट पाहायची रे” तिचा राग दबक्या स्वरात बाहेर पडला रे पडला की त्याच्या कारणांची सरबत्ती चालू व्हायची. त्यातली अर्धी पूर्ण खोटीच कारण ती सांगताना सुद्धा त्याचे डोळे हसत असायचे. जाताना मात्र कारण विचारावं असेही वाटले नाही तिला. जे दिसले ते इतके स्पष्ट होते की त्यावर त्याची सफाई मागणे म्हणजे पुढे दिसत असलेल्या खड्यात सरळ उडी मारणे. “ये तुमने ऐसा क्यूँ किया “ या डायलॉगचा तिटकारा होता तिला. अगदी सिनेमात जरी ऐकू आला, तरी ती वैतागायची.
क्यूँ किया म्हणजे ! करावेसे वाटले म्हणून केले .. आता केल्यावर चिखलात का लोळला हे ऐकून तो स्वतःच्या अंगाला लावून घ्यायचा की काय!
प्रयत्नपूर्वक कोरा चेहेरा ठेवून, लोकांच्या प्रश्नार्थक नजरांना तिने थंड नजरेने झेलले होते इतके की कोण कुणाला सोडून गेलेय हा प्रश्न पडावा आणि आता असा अचानक उगवला होता.
आपण तरी आता कशाला आलो आहोत !!!
त्याच्या जाण्याने विस्कळीत झालेले जग त्या लहान वयात कसेतरी सावरून घेतले होते तिने.
तेव्हा निभावले, आता हे सहन होणार आहे का !
जसा आला तसाच जाईल … मग ….
तरी राहवले नव्हते तिला. राहिलेच आहे किती आयुष्य! कोण पहिले सोडून गेले आणि कोण राहिले याला अर्थ आहे का आता! दोघांनाही एकमेकांना भेटायचे आहे हे आताच्या क्षणाचे सत्य आहे. कुठला राग आणि कसला अहंकार!
आयुष्याच्या या पडावावर तरी सत्य आणि स्वप्न याची गल्लत का करावी ! मन जे मागते तेच सत्य.
डोळे भरून पाहण्यासाठी एक जन्म अपुरा पडेल हे जेव्हा मनाला उमजते तेव्हा डोळ्यांची निराशा करू नये.
मैं इक ख्वाब सही आपकी अमानत हूँ,
मुझे संभाल के रखियेगा जिस्म-ओ-जान की तरह,
माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी केवळ स्वप्न आहे. मलाही माहित आहे पण ते आपले स्वप्न आहे. आता तरी ते तोडून जाऊ नकोस.
“सॉरी , खूप वाट पाहावी लागली का? ट्राफिक मध्ये अडकले… “
उसंत सुद्धा न घेताच ती बोलत सुटली.
बाहेर पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्याचाही बांध फुटला होता.
हातातील कॉफीची उष्णता मनावर पसरत होती. नको नको म्हणत असताना कितीतरी जुन्या क्षणांची उजळणी झाली. आठवणीच्या सरी झेलणे फक्त शक्य होते तिला आता.
इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या भावना अचानक मुक्त झाल्यासारखं वाटायला लागलं होतं तिला. त्याचा चेहेरा , त्याचे डोळे निदान आज तरी एकच भाषा बोलत होते.
बुला रहा है मुझे फिर किसी बदन का बसंत
गुज़र न जाए ये रुत भी कहीं खिज़ां की तरह
“हे काय होतंय आज … इतकी वर्षे ओठाच्या मिठीत बंद करून ठेवलेले आज असे बाहेर पडतंय.” त्याच्या मनात आले. मनाची तगमग मात्र कमी झाली होती.
“गप्प का आहेस ? रागावलीस ? पण नाही राहवले आज. चुकलो हे मान्य पण फाशीला सुद्धा माफी मिळते ग.
येतेस माझ्याबरोबर? कुठेतरी पळून जाऊया “
इतक्या वर्षात पहिल्यांदाच ती त्याचे अगतिक झालेले रूप बघत होती.
कभी तो सोच के वो शख्स किस क़दर था बुलंद
जो बिछ गया तेरे क़दमों में आसमान की तरह
एवढ्या वर्षानंतर झालेले प्रेमाचे पहिले दर्शन. त्याला त्याच्या स्वतःचाही विसर पडला होता.
रूसलेले क्षण, धरलेला अबोला, न दिलेली कारणे, मूकपणे तुकवलेली मान , घेतलेल्या जबाबदाऱ्या, पार पाडलेली कर्तव्ये , नियतीशी केलेली तडजोड ….
ह्या सगळ्यांना ती पुरून उरली होती त्याच्या मनात.

काहीच्या काही भन्नाट..
Thank you so much Nageshji.
खूपच मस्त 👌👌👌
एकदम खास.
झक्कास
Vidula, Thank you 🙂
Mangala , Thank you 🙂
फार सुरेख
Thank you Meenal .
सुरेख!…
Thank you Swati 🙂
नेहमीचेच काहीही अर्थ नसलेले शब्द…
त्या पेक्षा .हे बरे
झुकी झुली सी नजर बेकरार है के नहीं
दबा दबा सा सही दिल में प्यार है के नहीं..
मस्त लिहितेस तू नेहमीच
Indeed ..
शब्दांना सजीव करते गझल Shraddha .
झुकी झुकीसी नजरमे तेरा ईंतजार आजभी है.
नेहमी प्रमाणे अप्रतिम.
Thank you Ratnakar ji.
Yes , one of his best but here i tried to avoid filmi gazals .
अप्रतिम जमलाय हा लेख. आणि तुझ्या नेहमीच्या धाटणीचा नाही आहे. त्यामुळे त्यातलं वेगळेपण जाणवलं
Rajesh, Thank you .
फार फार सुंदर
अप्रतिम लिखाण
hank you Rashmi. 🙂
Thank you Rujuta .
अप्रतिम लिखाण गझल तर सर्व आवडीच्याच…
Thank you so much Varsha .
एक गजल शब्दांतली असते, ती वाचण्यात येते, भावते, स्मरणात राहते आणि मग कधीतरी आकस्मात, आणि भाग्यात असेल तरच, मूर्त रुपात, सदेह समोर येते… तिथे मग बड्या शायरांच्या नितांतसुंदर रचना जगजीत, गुलाम अली, मेहदी हसन, तलत यांच्या स्वरांचे साजश्रृंगार घेऊन प्रकटतात. हा संगम सगळ्याच ह्रदयांमधे घडत नाही, त्यासाठी ते ह्रदय हे तीर्थक्षेत्र असावं लागतं… म्हणून गजल is not for everybody.. It’s for chosen few.
लेख उत्कृष्ट!👍👌
Thank you Hemant .
खरंय .
शब्दांपलीकडे ज्याला जात येते, त्यांच्यासाठी गजल आहे.
खरेतर प्रत्येक संवेदनशील हृदयाची ती व्यथा आहे.
भारीच की…. खूप आवडलं 👌♥️
Thank you Vaishali. 🙂
छान लिहीलाय.
Thank you Sir.
किती किती तरल लिहिलंय!
गजल अशी पदर न् पदर उलगडली की मनात रूंजी घालतायत शब्द, आवाज आणि एक माहोल तयार झालाय मनात. 👌👌💕💕💕
Thank you Kamini.
प्रत्येक गजल ही तशा अर्थाने जखमी हृदयाची व्यथा असते.
आपल्या नजरेने पाहिले तर ती आपली होऊन जाते.
खूप सुंदर लिहिलंय गं
Bhairavi, Thank you.
दोन सुरेख गझला आणि त्यांच्यात इतक्या सहजतेने गुंफलेली दोघांची कथा … अप्रतिम जुळलय सगळं … खरच काही गोष्टी आपण स्वीकारतो, स्वतःशीच झगडत तडजोड करत आयुष्यात पुढे जात राहतो पण मन मात्र कधीतरी अगतिक होऊन असं बंड करतच …..
Thank you Nayana .
. खरंय . गजल च्या शब्दात भावना गुंफलेल्या असतात ..म्हणून त्या अनेकांना भावतात
अप्रतिम, शब्दातून गजलेच निखळ सौंदर्य उलगडून दाखवणे हे तुलाच शक्य आहे 🌹💞🙏
Thank you so much Roupali . 🙂