
Hello
मी प्रिया प्रभुदेसाई. जन्माने, कर्माने आणि विचाराने मुंबईकर. प्रवासानिमित्त कितीही फिरले तरीही मुंबईची ओढ रक्तात आहे.
माझ्या लहानपणी तरी या शहरात प्रत्येक गल्लीत लायब्ररी होती. ज्यांचा पुस्तक संग्रह मोठा होता, त्यांनी तर घरात सुद्धा छोटेखानी वाचनालय सुरु केलं होते. वाचनसंस्कृतीत बालपण गेलं.
दुसरा छंद होता गायन. सकाळी रेडिओ सुरु व्हायचा. संगीताचा कान रेडिओने तयार केला.
लहानपणी फार चित्रपट बघता आले नाहीत तरी सिने संगीतामुळे चित्रपटांचे वेड मात्र लागले. लिखाणाचे श्रेय मात्र फेसबुकला द्यावे लागेल. इथे ऐकणारी मित्र मंडळी मिळाली. आपण सांगावे, त्यांनी ऐकावे, त्यात त्यांनी भर घालावी आणि मस्त चर्चा रंगावी असा हा लेखनप्रवास सुरु झाला.
आवडीची गाणी, चित्रपट, शहरे, पुस्तके.. विषयाला तोटा नव्हता आणि गप्पांना अंत नव्हता. या छंदामुळे दिव्या मराठी वर्तमानपत्रात दोन वर्षे एक सदर चालवण्याची संधी मिळाली. साप्ताहिक विवेक मध्ये सदाबहार गाण्यांवर, प्रादेशिक सिनेमांवर लिहिले.
रेडिओवर वनिता मंडळ मध्ये कार्यक्रम केले. सेन्सॉर बोर्डवर चार वर्ष ज्युरी म्हणून काम केलं. “जुळल्या सगळ्या आठवणी स्वर आले दुरुनी” हे पुस्तक सुद्धा आले. त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे हा ब्लॉग. गप्पा मारायचा नवीन कट्टा.
आवडीचे सिनेमा, गाणी, त्यातील कलाकार, कविता, आवडलेली पुस्तके .. आणि चांगले ते सारे काही.
So inviting you all.
या, बसा, वाचा, तुम्हाला जे आवडेल ते सांगा, नाही आवडले तर ते सुद्धा नक्की सांगा. तुमचा नजरिया सुद्धा नक्की ऐकायला आवडेल.