बाराचे ठोके पडायला सुरुवात झाली. दहा, अकरा, बारा .. हुर्रे. गच्चीत एकच जल्लोष झाला.
पार्श्वभूमीला मंद आवाजात जगजीत गात होता. रंगीबेरंगी कुशन्स ठेवलेल्या भारतीय बैठकीवर बायकांच्या गॉसिपयुक्त गप्पांना उधाण आले. मध्यभागी ठेवलेल्या टेबलकडे पुरुष माणसे वळली. लखलखीत क्रिस्टलच्या ग्लासांत चमकदार सोनेरी पेयं ओतली जाऊ लागली. बर्फाचे खडे पडले आणि जोरदार चियर्सने मैफिलीला सुरुवात झाली. पार्टी आता वयात आली.
मुलांचा खेळ रंगात आला होता. गच्चीच्या एका टोकाला तिच्या मैत्रिणी गझलच्या ठेक्यावर चक्क गरबा खेळत होत्या. हसू दाबत तिने हळूच एका छोट्याश्या बॉक्स मध्ये ठेवलेली पेस्ट्री उचलली. सावधगिरीने आजूबाजूला पाहिले. तिच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. हळूच खाली सटकून तिने चावीने हलक्या हाताने घराचे दार उघडले.
“ एवढ्या लवकर पार्टी झाली सुद्धा?” आजीचा आवाज आला.
“ नाही ग, फक्त कल्पनाला फोन करते हैप्पी न्यू इयर करायला. मग जाते वर. तू झोप”
बोलता बोलताच तिने नंबर फिरवला..
“ हॅलो, बघ , बरोबर बारा वाजता फोन केला की नाही? आज थांबणार का इथेच, का घरी चालला आहेस?”
“ दहाच मिनिटात तुझ्या घरावरून जाईन. निघतो आहे आताच. खाली ये न दोन मिनिटे? फक्त दोन. तुला विश करून निघतो “
“अरे, काहीही काय! वरती आता फटाके लावायला सुरुवात होईल. सगळा जल्लोष चाललाय. कशी येऊ? शिवाय खाली खूप काळोख आहे रे. मला भीती वाटते. आलास की तूच जरा वरती ये न. प्लीज.”
“ काय ग हे घाबरूट. काळोखाला घाबरतेस. तेही तुझ्या अंगणातल्या. मग आपला पुढचा रस्ताच तर अंधारात आहे. काय करशील? “
“ तू असशील की”
तो प्रश्न नव्हता. विश्वास होता.
“ वेडी आहेस खरंच. मी जिन्यात येतो. पटकन ये “
मेरे जैसे बन जाओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
दीवारों से टकराओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
जिन्यावर मिट्ट अंधारअसायचा. तिला भीती वाटायची. चुकून पायाखाली कुणी आले तर! एखादे भटके कुत्रे, मांजर जिन्यावरून खाण्याच्या शोधात हमखास यायचे.
ती दोन जिने खाली उतरली तर कुणीच नव्हते. वरती जाऊया का परत. मनात येतं न येतं तोच हाताला स्पर्श झाला.
“कोण आहे” हा प्रश्न तोंडातून येतो न येतो, तोच,
“ श्श .. मी आहे ग”
“थँक गॉड. आज तरी वेळेवर आलास.
खाली कुणी नव्हते न? कुणी पहिले तर माझा जीव जाईल! “
“माझा परत येईल . खरे सांगू , प्रश्नच सुटेल. आपल्याला पकडतील मग प्रश्नाचा तास आणि समाधानकारक उत्तरे देऊन आपण पास होऊ . वेटिंग फॉर पकडले जाणे खरेच .“
त्याच्या त्या ”खरेच” मध्ये एवढी व्याकुळता होती की ती गालात हसली.
बरे झाले काळोख आहे. हे असेच झाले तर बरेच होईल हे तिला सुद्धा पटतंय हे त्याला कळले असते तर त्याची दोन मिनिटे संपलीच नसती.
हर बात गवारा कर लोगे मन्नत भी उतारा कर लोगे
तावीज़ें भी बँधवाओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
“आ कर पटकन “
“ व्हॉट? आर यू शुअर ? “
“ नविन वर्षाच्या सुरुवातीलाच वात्रटपणा नको हं. अख्खे वर्ष तेच करत बसशील. त्यापेक्षा केक खा.हॅपी न्यू इअर , मी अजून कुणाला केले नाही. आता करेन. चल निघू ?”
“ हो ग. पण काहीतरी आणले आहे तुला? ते घेशील तरी”
“ आता हे काय आहे ?”
“ कॅसेट, मला खूप आवडला हा सिनेमा. तुला आणलीय.“
“ कोणता रे ? “
“ अनुभव ,संजीव आणि तनुजाचा आहे.
“ मला आणलास मग माझ्या आवडीचा तरी आणायचास. काय रे तू पण !
“वाकड्याचा? नाही ग. माझा चॉईस एवढा वाईट नाही. त्याला देव म्हणणे म्हणजे देवाचा अपमान आहे हे माझ्यासारख्या नास्तिकाला समजते पण तुला नाही.
“ जळू नकोस “
“ माझ्या आजोबांच्या वयाचा असेल तो. जाऊदे. आज आपल्यात खरा देव सुद्धा नको. हॅपी न्यू इअर. “
त्याच्या ओठांचा कळत न कळत हाताला झालेला स्पर्श . शहारून गेली ती.
. “बघ हं नक्की. तुला आवडेल, पुढच्या आठवड्यात येईन तेव्हा सांग. .. बाय. ”
त्याचा चेहरा दिसत नव्हता पण आवाज कशाला एवढा मिश्किल ! नक्की कसा असेल हा सिनेमा.
खरंतर रात्रीच बघूया का ?
तिला धीर नव्हता. काही विचित्र तर नसेल न . घरात एवढी माणसे! चोरून पाहणे शक्यच नाही.
छे! तो चांगला आहे . असे कसे देईल आणि तसे तर ब्लू लगून सुद्धा घरीच बघून झाला होता. एवढे थोडेच लहान आहोत आपण.
मनाचा पूर्ण गोंधळ उडाला होता आणि पोटात फुलपाखरे बागडत होती.
“ कोणता सिनेमा ग ? अनुभव ? पण त्यात तर शेखर सुमन आहे … शी घाणेरडा आहे ग सिनेमा असे ऐकलंय ‘ बहीण पुटपुटली.
“ यात संजीव आहे ग ..जुना आहे हा. “
ती बोलली खरी पण मनात धाकधूक होतीच.
रात्री हळूच व्हिडिओ ऑन केला आणि आजी सगळे आटपून आतच आली. हातात फुलवाती. नजर समोर .. सुरुवातीचा पार्टीचा सीन , येणारी जाणारी माणसे, त्यात गुंतलेली मानसी. कामात बुडालेला नवरा आणि कंटाळलेली बायको यात पाच एक तरी रिळे संपली. जांभई देऊन आजीने तिथेच पाय पसरले.
“काय माणूस आहे हा! नवरा बायको एकमेकांना अशी बोअर करतात असे सांगायचे आहे का याला. शी, त्यापेक्षा सिलसिला परवडला.“
कथा संथपणे पुढे सरकत होती.
फास्ट फॉरवर्ड करायचे का ? तिचा हातही गेला आणि झायलोफोनचा पीस वाजायला सुरुवात झाली.
मुझे जाँ न कहो मेरी जाँ
मेरी जाँ, मेरी जाँ.
पावसाची गाणे असूनही याचे शूटिंग एका खिडकीच्या फ्रेममध्ये बंदिस्त केले होते. बंद काचा , त्यावरून ओघळणाऱ्या पागोळ्या, पाण्यात चिंब भिजल्याने शहारणारी झाडे आणि त्यांच्याकडे टक लावून पाहत असणारा संजीव. ओठावरचे मिस्कील हास्य आणि गात्रागात्रातून जाणवणारी तृप्ती. जे काही त्या चार भिंतीत घडले होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात, ओठांमध्ये दबलेल्या हास्यात एवढे स्पष्ट दिसत होते की तीने दचकून आजीकडे पाहीले.
कसले सिनेमा बघतेस! ना गाणी , ना संवाद … एकच खोली दाखवतायत कधीपासून असे पुटपुटत ती झोपून गेली होती.
This was the most intimate communication that she had experienced so far . A liquid romance. न राहवून तिने परत रिवाइंड केले. हे असे प्रेम असते!
जब सूरज भी खो जायेगा और चाँद कहीं सो जायेगा
तुम भी घर देर से आओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
आता जे काही स्क्रीनवर चालू होते ते सगळेच धडधड वाढवणारे.
काही महिन्यापूर्वीचा त्यांचा संवाद आठवला तिला. संवाद कसला वादच तो. सकाळी लख्ख ऊन म्हणून छत्री नेली नसतानाच सरी कोसळायला लागल्या. न भिजताच चिंब झालेला तिचा चेहरा पाहूनही, आपल्या जागेवरून ढिम्म न हलता म्हणाला,
. “मला नाही आवडत कुणी तुला पाहिलेले, तेही असे . पाऊस थांबल्यावर निघूया. चल, आधी तुझी लाडकी कॉफी घे“
“ झीनत अमान का मी, मला बघणार आणि तू बघ न,बोटांच्या फटीतून बघ , पण चल न “
“ ती पब्लिक प्रॉपर्टी असेल लोकांची .. तू नाहीस “
“ मी तुझीही नाही “
“ आहेस …अख्खीच्या अख्खी ..आणि मी तुझी “
गाल फुगवून बसलेल्या तिला पाहून त्याच्या मनात आले, ठोका चुकतात अशा वेळा कमी असतात तेच बरे .
“ पावसात न जाताही भिजता येते. सांगेन तुला नंतर. “
“ हो तर, कॉफी आणि भजी बरोबर न ? मी कधीच नाही करणार. तूच कर आणि कॉफीत भिजवून खा.”
सिनेमात आता पावसाने जोर धरला होता. बाहेर मिट्ट काळोख त्यात कांचांवर ओघळणाऱ्या पाण्याने बाहेरील जगात आणि त्यांच्यात एक भिंत निर्माण केली होती. सगळ्या जगापासून फारकत घेतलेली ती दोघे आणि त्यांना स्वतःच्या कुशीत दडवणारा पाऊस. मनावर दडपण आले तिच्या.
श्वास चालू आहे का थांबला आहे ? हालचाल सुद्धा करायची तिला भीती वाटू लागली.
तनहाई के झूले झूलोगे हर बात पुरानी भूलोगे
आईने से तुम घबराओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
हे सगळे माझ्याबाबतीत सुद्धा असेच घडणार का? त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला. एक अनोळखी थरथर. तोंडाला कोरड पडली तिच्या. पडद्यावरचा रोमान्स मनात उतरू लागला तसे तिने बटन बंद केले. पांघरुणात शरीराला गुरफटवून घेतले तरीही तिला पोकळी जाणवत होती. शरीराची ओढ एवढी तीव्र असते?
म्हणून माणसे आपल्या कक्षा सोडूनही भरकटतात का!
तनुजाच्या जागी त्याला मी दिसत असें का जसे मला … तिला पुढचा विचारच सहन होईना. डोळे घट्ट बंद करून घेतले तरी गाण्याची फीत ज्या ठिकाणी अडकली होती, तिथेच अडकून वाजत होती तिच्या डोक्यात.
बेचैनी जब बढ जायेगी और याद किसी की आयेगी
तुम मेरी ग़ज़लें गाओगे जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
जब इश्क़ तुम्हें हो जायेगा
Disclaimer:
Priya Prabhudesai Writes claims no credit for any image or screenshots posted on this site. Images are posted here to make the text interesting. The images and screenshots are the copyright of their original owner

अप्रतिम
Swati, Thanks dear 🙂
खूप सुंदर 👌👌
Thank you Mangala . 🙂
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Thank you Maddhuri 🙂
Class ❤️ Immortal ❤️
Thank you Prashant 🙂
अहाहा!☺️☺️☺️
Nostalgia, Isn’t it 🙂
Thank you Gauri 🙂
गाणं किती सुंदर म्हटले आहे शिवाय जगजीत सिंग च्या गजलेच्या ओळी केवळ आणि केवळ तृप्ती. तितक्याच अप्रतिमपणे तू उलगडून पुन्हा प्रेमात पाडल आहेस तुझ्या लिखाणाच्या आणि त्या भावनेच्या 😍💕👌👌👌👌
Roupali Thank you.
हे गाणे जेव्हा पहिले तेव्हा खरंच मन फार कोवळे होते. तेव्हा कुठे नेट किंवा अशी पुस्तके , सोवळे वातावरण
त्यामुळे हे गाणे फार जवळचे
आणि अर्थात जगजीत च्या गझल्स , मला शब्दांसाठी खूप आवडतात.
आहा❤️
परत “अनुभव “सिनेमा वर लिहिलंस.
खूप आवडता.
तुझा पण आहे ना?
yes my most favorite Cinema. Actually the treatment that is given to this complicated topic. Basu Bhattacharya made it so simple .
Thank you Vidula .
काय कमाल लिहिलंय👌👌
मज़ा आ गया!! बढिया बढिया ❤
खूप भारी💜
हा ब्लॉग एकदम सुपर डुपर हिट्ट 💙
Kamini, Thank you so much 🙂
खूप आधी अशा काही कथा लिहिल्या होत्या . त्या घालेन आता ..काही नवीन लिहीन
गझल अशी जास्त कळते …आतून भावते 🙂
Thank you so much Kamini.
क्लास… ❤️❤️
hank you dear Sudha.
Speechless writeup Priya mam 😍
This is my favourite song 😍
Thank you so much 🙏😍
My pleasure Ash , Thank you 🙂